दै.नगरशाही भेंडा प्रतिनिधी –
श्री मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था संचलित जिजामाता पब्लिक स्कूलमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू जयंती निमित्त बालदिन साजरा करण्यात आला . यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रसंगी व्यासपीठावरती प्रा.दीपक राऊत, शीला गिरीकुमार, अर्चना मिसाळ, तबसुम शेख ,आदिती अभंग यावेळी उपस्थित होत्या .यावेळी पाचवीच्या विद्यार्थ्यांनी व त्यांचे वर्गशिक्षक श्री .सचिन गावडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली एक मनोरंजक नाटक सादर करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले .बाल दिनाच्या निमित्ताने क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले . यावेळी प्रा.डॉ.राजेंद्र गवळी प्रा.दीपक राऊत यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुले व मुली यासोबत शिक्षकांनी देखील खेळाचा मनमुराद आनंद लुटला. खेळामुळे विद्यार्थ्यांमध्ये एकात्मतेची भावना निर्माण होते, व विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळतो. या दिनानिमित्ताने सर्व विद्यार्थ्यांना मिठाईचे वाटप करण्यात आले. स्पर्धेमध्ये विजय संघाचे सर्वांनी कौतुक केले. या निमित्ताने सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सुदीप खरात, संदीप घोलप, प्रवीण कोकरे व सर्व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.










