5.1 C
New York
Saturday, December 6, 2025

Buy now

spot_img

क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या माध्यमातून नेवासा नगरपंचायत निवडणूक लढविणार-.माजी मंत्री शंकरराव गडाख*.

*कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेतला निर्णय*. .दै.नगरशाही
नेवासा प्रतिनिधी.
नेवासा नगरपंचायत
नगरसेवक व नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रकिया सोम दि 10 नोव्हेंबर 2025 पासून सुरू होणार आहे या पार्श्वभूमीवर
रवी दि 9 नोव्हेंबर 2025 रोजी
माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या प्रमुख उपस्थितीत नेवासा शहरातील
कार्यकर्त्यांची मिटींग आयोजित करण्यात आली होती.
याप्रसंगी नानासाहेब तुवर चेअरमन मुळा सह साखर कारखाना,ऍड आण्णासाहेब अंबाडे, आण्णासाहेब पटारे यांनी मनोगत व्यक्त केले व माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली
नेवासा नगरपंचायतच्या सर्वच
नगरसेवक पदाच्या जागा व
नगराध्यक्षपदाची जागा मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा उपस्थित सर्वांनी याप्रसंगी निर्धार केला.
याप्रसंगी बोलतांना माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी
स्पष्ट केले की आगामी नगरपंचायत निवडणूक क्रांतीकारी शेतकरी पक्षाच्या माध्यमातून लढविण्यात येणार आहे. त्यांनी सांगितले की, “आपली ही लढाई ही कोणत्याही व्यक्ती वा पक्षाविरोधात नसून, नेवासा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आहे.
सर्वांना सोबत घेऊन काम काम करू असे ते म्हणाले.
गडाख यांनी पुढे सांगितले की, सर्व कार्यकर्त्यांनी एकदिलाने व शिस्तबद्धपणे काम करून नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदावर जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणावेत.
सोम दिनांक 10 नोव्हेंबर 2025 पासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होत असल्याने, आजच्या बैठकीत कार्यकर्ते व संभाव्य उमेदवारांना आवश्यक त्या सूचना व मार्गदर्शन करण्यात आले.
क्रांतीकारी शेतकरी पक्षाच्या माध्यमातून येणाऱ्या निवडणुकीत नव्या जोमाने आणि विकासाच्या हेतूने उतरल्याचे आमदार गडाख यांनी यावेळी स्पष्ट केले.
याप्रसंगी नेवासा शहरातील प्रमुख कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.सन 2017 मध्ये झालेल्या नेवासा नगरपंचायत निवडणुकीत
माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली क्रांतिकारी पक्षाचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले होते.सन 2017 मध्ये झालेल्या नेवासा नगरपंचायत निवडणुकीत
माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली क्रांतिकारी पक्षाचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले होते.
फोटोओळी…
नेवासा नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलतांना माजी मंत्री शंकरराव गडाख

Related Articles

ताज्या बातम्या