राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नवचैतन्य…
दै.नगरशाही अहिल्यानगर प्रतिनिधी
मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे सरचिटणीस ,आमदार शिवाजीराव गर्जे यांच्या उपस्थितीत श्री. मुरुकुटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला.
श्री बाळासाहेब मुरकुटे यांनी २०१४ मध्ये काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश करून नेवासा विधानसभेची निवडणूक लढविली आणि त्यात त्यांनी तत्कालीन राष्ट्रवादीचे आमदार शंकरराव गडाख यांचा पराभव करून ते आमदार झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी पुन्हा भाजपा कडून उमेदवारी केली. मात्र त्यात त्यांना शेतकरी क्रांतीकारी पक्षाचे आमदार शंकरराव गडाख यांच्या कडून
पराभव पत्करावा लागला.
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना भाजपा कडून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी बंडखोरी करत प्रहार जनशक्ती पक्षामध्ये प्रवेश करून उमेदवारी केली. मात्र त्यात शिवसेनचे विठ्ठलराव लंघे यांनी त्यांचा पराभव केला. बंडखोरी केल्याने भाजपाने ही त्यांना पक्षाबाहेरचा रस्ता दाखविला. तेंव्हा पासून ते भाजप, राष्ट्रवादी मध्ये प्रवेशसाठी प्रयत्नशील होते. शेवटी गुरुवार दि. ६ नोव्हेबर रोजी त्यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये प्रवेश केला आहे.
त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेशाने नेवाशात पुन्हा एकदा राष्ट्रवादी पक्षाला पाठबळ मिळाले आहे.










