दै.नगरशाही भेंडा प्रतिनिधी नेवासा तालुक्यातील भेंडा बु !! येथील बडोदा बँकेच्या शाखेने कर्ज माफीच्या निर्णयामुळे कर्ज वसुली थांबवावी आणि ग्राहकांशी उद्धट वागणाऱ्या मॅनेजरची बदली करावी करा अशी मागणी निवेदना द्वारे केल्याची माहिती सरपंच संघटना अध्यक्ष सरपंच शरदराव आरगडे यांनी दिली.
सरपंच संघटनेने विभागीय मॅनेजर यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की अतितृष्टी झाल्याने शासनाने ३० जुन २०२५ कर्ज माफी करण्याची घोषणा केलेली आहे. तेव्हा आपण शेतकऱ्याकडून कुठल्याप्रकारची कर्ज वसुली करू नये.
आपले भेंडा शाखेचे मॅनेजर उच्चशिक्षित असून, अनेक वर्ष महाराष्ट्रात नोकरी करत आहे तरी देखील त्यांना मराठी येत नाही. आणि आमच्या अडाणी गोरगरीब खातेदारा कडून मात्र हिंदी बोलण्याची अपेक्षा करता? शासनाने देखील वेळोवेळी स्थानिक भाषेला प्राधान्य देण्यास सांगितले आहे. सदर मॅनेजर ग्राहकांनी केलेल्या तक्रारीवर कुठलीही दखल घेत नाहीत. जाणीवपूर्वक शेतकऱ्यांन, खातेदारांना त्रास देत आहेत. बँका एकीकडे “अर्ज द्या कर्ज घ्या” शेतकऱ्यांसाठी सोलापूर येथे योजना राबवत आहे. आणि आपल्या बँकेचे मॅनेजर वर्ग दोन च्या जमिनीवर पीक कर्ज देत नाहीत. यापूर्वी आपल्याच बँकेने त्याच उताऱ्यावर पीक कर्ज दिलेले आहे. परंतु सदर मॅनेजर मात्र वर्ग दोन च्या जमिनीवर पीक कर्ज देत नाहीत. ही तर सरळ सरळ शेतकऱ्याची अडवणूक आहे. सोनेतारण करिता जास्त दराने ५००/- किंमतीचा स्टॅम्प ६००/- ला देतात. तब्बल २०% सर्व्हिस चार्जे आकारून ग्राहकांना कोणती सुविधा देतात?
निवेदनाची त्वरित दखल घेऊन येत्या ८ दिवसात सदर ब्रिटिश अधिकारी असल्या सारखं वागत असलेल्या मग्रूर, उद्धट बँक मॅनेजर वर त्वरित कारवाई करून खालील प्रश्नावर कार्यवाही करावी ही विनंती. अन्यथा ८ दिवसानंतर केव्हाही सदर मॅनेजरला काळे फासने, पुतळा जाळणे अशा प्रकारचे तीव्र आंदोलन करण्यात येईल.
असा इशारा यावेळी देण्यात आला
१) शेतकऱ्याची कर्ज वसुली शासकीय आदेशान्वये त्वरित थांबवावी.
२) सदर मग्रूर उद्धट मॅनेजरचीत्वरित बदली करावी. आणि त्याच्या वर्तणुकीची चौकशी करून कठोर कारवाई करावी.
३) ग्राहकांशी मराठीतच संवाद साधावा.
४) नेवासा तालुक्यात ओला दुष्काळ पडल्याने शासन निर्देशानुसार शेतकऱ्यांची वसुली थांबवावी.
५) वर्ग दोन च्या जमिनीवर पीक कर्ज मिळावे
६) शेतकऱ्यासाठी सोने तारण कर्ज दररोज करावे आणि त्यासाठी किमान रकमेची अट नसावी
७) सोनेतारण कर्जासाठी स्टॅम्प पेपर पूर्वीप्रमाणे १०० च्या पटीत घ्यावे, डायरेक्ट ५००, बेकायदेशीर २०% सर्व्हिस चार्ज न घेता स्टॅम्प पेपर उपलब्ध करून द्यावेत.
निवेदनाच्या प्रती
मा. तहसीलदार साहेब, नेवासा
मा. जिल्हाधिकारी साहेब, अहिल्यानगर,मा. मॅनेजर साहेब, बँक ऑफ बडोदा, शाखा भेंडा यांना दिल्या असुन सोबत
महाराष्ट्र सरकार चा शेतकऱ्याकडून कर्ज वसुली
न करण्या सबंधित जी. आर. जोडला आहे
यावेळी वडुलेचे सरपंच दिनकरराव गर्जे,भेंडा खु चे सरपंच वैभवराव नवले, नजिक चिंचोली सरपंच भागचंद चावरे, वंजारवाडी सरपंच महादेव दराडे, कॉ, आप्पासाहेब वाबळे, सेक्रेटरी अहिल्या नगर जिल्हा किसान सभा, भारत आरगडे, सेक्रेटरी भाकप नेवासा आदी उपस्थित होते










