तसेच इतर विषयांमध्ये सुद्धा वसई कला क्रीडा त्याचबरोबर मॅरेथॉन अशा अनेक स्पर्धा व दोन हजार 2000 मध्ये इंग्रजी विषयाचे प्रशिक्षण स्टेट लेव्हल डिव्हिजन लेव्हल तज्ञ मार्गदर्शक म्हणून कार्य केले वसईतील आत्तापर्यंत जवळजवळ यशस्वी च्या 29 बॅचला सरांनी मार्गदर्शन केले वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्यात त्यांना प्राविण्य मिळवून दिले
त्यांचा 31 ऑक्टोबर 2025 रोजी सेवापूर्तीचा समारंभ सेंट एलिझाबेथ कॉन्व्हेंट हायस्कूल होळी येथे सकाळी साडेदहा ते एक वाजेपर्यंत संपन्न झाला यासाठी माननीय महापौर श्री प्रवीण शेट्टी साहेब त्याचबरोबर माजी परिवहन समिती अध्यक्ष श्री प्रितेश पाटील न्यू इंग्लिश स्कूल येथील प्रिन्सिपल सौ शोभना वॉज तसेच ग्रामविकास अधिकारी श्री रमेश उंदरे साहेब व ग्राम विकास माजी विस्तार अधिकारी श्री चव्हाण साहेब शालेय कमिटी सदस्य श्री स्टॅनि अलमेडा सर ग्रेगी मेलो सर शाळेचे माजी कर्मचारी विल्सन गोम्स लायन्स क्लब ऑफ युनिक वसईचे अध्यक्ष निलेश घरत सेक्रेटरी दीपक बडगुजर ट्रेझर श्री काळे साहेब तसेच इव्हेट कुटीनो मॅडम उपस्थित होत्या संस्थेच्या मॅनेजर सिस्टर लूसी शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर्स स्मिता आगासकर या उपस्थित होत्या

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ अलका रॉड्रिक्स यांनी केले विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले त्यामध्ये कुमारी धृती घरत इयत्ता नववीच्या विद्यार्थिनी हिने मनोगत व्यक्त केले सौ मीना रॉड्रिक्स यांनी शिक्षकांच्या वतीने मनोगत व्यक्त केले श्री चव्हाण साहेब त्यांनी अलमेडा सर सेंट झेवियर माणिकपूरचे मुख्याध्यापक मायकल
घोणसालवीस यांनीही आपले मनोगत करून कार्यक्रमास शोभा आणली शाळेच्या मुख्याध्यापिका व मॅनेजर यांनीही सेवापूर्ती निमित्त शुभेच्छा दिल्या मुलगी सुप्रिया ऋषिकेश सांबारे हिने वडिलांविषयी सेवापूर्ती निमित्त मनोगत व्यक्त केले त्यासाठी सत्कारमूर्ती श्री राजेंद्र कुमार रामदास ढगे यांनी या सर्व सेवापूर्तीच्या मनोगतास प्रतिसाद देऊन मनोगत व्यक्त केले शाळेतील सर्व शिक्षक अविनाश सर चेतना मॅडम डोनेटा लोपिस जॉर्डन अलमेडा भानु प्रताप सिंग प्रायमरीच्या कुमारी संगीता डाबरे लोरेटा कुटुंबातील पत्नी सौ छाया ढगे मुलगी सौ सुप्रिया ऋषिकेश सांबारे कुमारी प्रतीक्षा ढगे चिरंजीव प्रथमेश ढगे तसेच सेंट झेवियर चे शिक्षक श्री नामदेव पाटील ठाणे पालघर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ पतपेढी कार्यवाह व संघटना सेक्रेटरी श्री नामदेव पाटील सर न्यू इंग्लिश स्कूलचे शिक्षक व ठाणे पालघर माध्यमिक शिक्षक संघ पतपेढी मर्यादित सफाळीचे माजी कार्यवाह श्री रखमाढोणेमाजी विद्यार्थी सुनील मोसेकर निलेश घरत जॉर्डन डिमेलो या कार्यक्रमास उपस्थित होते
त्यासाठी वसई विकास चे माननीय अजय जी खोकाणे साहेब संतोष वाळवईकर साहेब प्रशांत घुमरे साहेब यांनीही शुभेच्छा पर संदेश पाठवून सेवापूर्तीच्या शुभेच्छा दिल्या मा ढगे सरांच्या जीवनातील अनेक विद्यार्थी परदेशात गेलेले आहे त्यांनी सुद्धा कॅनडा व कुवेत इंग्लंड या ठिकाणाहून सत्कारमूर्ती श्री ढगे सरांना शुभेच्छा पाठवल्या शाळेतील इयत्ता नववी दहावीच्या विद्यार्थ्यांनी लेझीमच्या तालात सर्व कुटुंबाचे स्वागत केले व पाचवी ते पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत गीत व इतर नृत्य करून सर्वांचे मनोरंजन केले
शेवटी शाळेच्या मॅनेजर मुख्याध्यापिका सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी भेटवस्तू शाल श्रीफळ देऊन सत्कार केला व उपस्थित सर्व मान्यवरांनी वेगवेगळ्या प्रकारे भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन सत्कारमूर्तीचा सत्कार केला त्यानंतर शाळेचे शिक्षक श्री दिलीप रामरंजन चव्हाण यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता करून उपस्थितांबरोबर स्नेहभोजन करून सेवापुर्तीचा कार्यक्रम संपन्न झाला










