* दै.नगरशाही भेंडा वार्ताहर :
श्री मारूतरावजी घुले पाटील शिक्षण संस्थेच्या डॉ.राजेंद्र गवळी व दिपक राऊत यांचा शैक्षणिक कार्याबद्दल शिक्षक दिनाच्या औचित्याने ९२.७ बिग एफएम, अहिल्यानगर यांच्या वतीने “शिक्षक सन्मान सोहळा २०२५” या विशेष कार्यक्रमांतर्गत मा.कुलगुरू प्रो.डॉ.सर्जेराव निमसे तसेच मा.धनेश खत्ती, ग्रुपहेड ९२.७ बिग एफएम, अहिल्यानगर व छ्त्रपती संभाजीनगर यांच्या प्रमुख उपस्थितीत हॉटेल संजोग, अहिल्यानगर येथे शनिवार दि.२० सप्टेंबर २०२५ रोजी शिक्षण क्षेत्रातील अमूल्य योगदान आणि समाज घडविण्यातील भूमिका अधोरेखित करीत सन्मान करण्यात आला.
. डॉ.राजेंद्र गवळी व दिपक राऊत यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.आ.डॉ.नरेंद्रजी घुले पाटील, मा.आ.चंद्रशेखरजी घुले पाटील, मा.डॉ.क्षितिज घुले पाटील, मा.आ.पांडुरंग अभंग, अॅड देसाई देशमुख, सचिव अनिल शेवाळे, सेक्रेटरी रवींद्र मोटे, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी प्रा.भारत वाबळे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक या सर्वांनी अभिनंदन केले आहे.










