दै.नगरशाही विशेष प्रतिनिधी :
मराठा समाज्याच्या मागण्यासाठी मनोजदादा जरांगे पाटील यांनी मुंबई येथिल आझाद मैदानावर पाच दिवस उपोषण करत सरकारला मागण्या मान्य करणासाठी भाग पाडले. शासनाकडून मंत्रि राधाकृष्ण विखे पाटील हे संकटमोचक ठरले. पन्नास वर्षात ज्या मागण्यापासून मराठा समाज वंचीत राहिला होता त्या मागण्या आज अखेर सरकारकडून प्रभावीपणे मान्य केल्या गेल्या, कुणावरही अन्याय होऊ नये ही भावना आपल्या मराठा समाजाच्या असतात, कारण आपण जेथे राहतो तो आपला महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या वैचारिक वारसाने चालतो संविधानाने दिलेल्या अधीकारांनी येथे लोकशाही असल्याने आपल्याला उपोषण करत आंदोलने करत मागण्या मान्य करण्यात आल्या,
. यावेळि मा.सरपंच दौलत देशमुख,मा.उपसरपंच भाऊसाहेब फोलाणे, मनसेचे किरण शिंदे,सतिष कावरे,कैलास म्हस्के,उत्तम देवढे,राजेंद्र गरड,देविदास गरड,किशोर साबळे,वैभव चेमटे,प्रमोद दरंदले आदिसह युवक सहभागि झाले होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञानदिप देशमुख यांनि केले. आजचा विजय हा मराठा समाजासाठी बलिदान देणाऱ्या सर्व मराठा बांधवांच्या बलिदानाने मिळालेला असल्याचे सांगितले., इतर सर्व समाजाने देखिल पाठिंबा दिला,मदत पाठवलि त्या सर्वाना वदंन करण्यासाठी तसेच सरकारने सकारात्मक भूमिका घेत सर्व मागण्या मान्य केल्याने सरकारचे आभार शिवसेनेचे नेते सोमनाथ कचरे यांनी मानले.