दै.नगरशाही विशेष प्रतिनिधी: समीर शेख
अहिल्यानगर मधील नेवासा तालुक्यातील तेलकुडगाव येथील घाडगे पाटील माध्यमिक विद्यालयातील सहशिक्षक पदी कार्यरत असलेले अध्यापक सुनील एकनाथराव खंडागळे यांनी राज्य पात्रता- सेट-परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात मराठी विषयात उत्तीर्ण होत यश मिळवले.
प्रा.सुनील खंडागळे यांनी सेट परीक्षा उत्तीर्ण होत मिळवलेल्या यशाबद्दल त्यांच्या मूळ गावी-वडीगोद्री तसेच ते कार्यरत असलेल्या तेलकुडगाव,नेवासा परिसरात मित्र-परिवाराकडून स्वागत होत आहे.
प्रा. सुनील खंडागळे यांना त्यांचे मोठे बंधू प्रा. अनिल खंडागळे यांचे मार्गदर्शन लाभले.त्यांच्या यशाबद्दल त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संस्थेच्या अध्यक्षा सुमतीताई घाडगेपाटील,उपाध्यक्षा स्नेहल चव्हाणपाटील,सचिव मनिष घाडगेपाटील, सहसचिव डॉ.श्रुती आमलेपाटील,संस्थेचे विश्वस्त चेतन चव्हाणपाटील व विद्यालयाच्या प्रशासक मनिषा राऊत, प्राचार्य सोपानराव काळे,प्राचार्य भाऊसाहेब दुधाडे,दत्तात्रय वांढेकर, बाळासाहेब कोकरे,मनोज घाडगे,सचिन कर्डिले,शिवाजीराव काटे,नामदेव ताके, बाळासाहेब काळे,अतुल कराड,किरण पाठक,समीर शेख यांनी अभिनंदन केले.