शेवगाव भगूरवरुर भागातून मुस्लिम महिलांनी पाठवल्या भाकरी ,ठेचा
दै.नगरशाही
शेवगाव प्रतिनिधी । परविन शेख :
मुंबईतील आझाद मैदानावर मराठा आरक्षण चळवळीतील संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील उपोषणाला बसले असून त्यांना साथ देण्यासाठी राज्यभरातील मराठा बांधव मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. सरकारने आझाद मैदान परिसरातील हॉटेल बंद ठेवले असल्याने आंदोलनकऱ्यांच्या जेवण-पाण्याची मोठी गैरसोय निर्माण झाली आहे.
चटणी व भाकरी मराठा बांधवांसाठी गाव खेड्यातून टेम्पोभर जेवण मुंबईकडे.
सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनासाठी शेवगाव तालुक्यातील भगूर,अमरापूर, फलकेवाडी या तीन खेडेगावांनी एक एक शिदोरी उपक्रम राबविण्यात आला. या अंतर्गत मुंबई येथील आंदोलनाच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या समाजबांधवासाठी भाकरी, ठेचा शेंगदाणा चटणी, लोणचे आदी. अन्नपदार्थ मुंबईला पाठवण्यात आले. भगूर, अमरापुर व फलकेवाडी येथील मराठा क्रांती मोर्चा च्या वतीने 5 हजार लोकांसाठी आवश्यक जेवण भाकरी, ठेचा आदी, साहित्य तसेच ३५०० हजार पाणी बॉटल पाठविण्यात आल्या आहेत. मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू असेपर्यंत शेवगाव मधून ही शिदोरी पाठवली जाणार आहे.
भगुर येथे शहर आणि तालुक्यातील समाज बांधवांनी अन्नपदार्थ आणून जमा केले. वरुरभगूर परिसरातील मुस्लिम महिलांनी देखील आपल्या मराठा बांधवांना भाकरी भाजी पाठविल्यात व लवकरात लवकर सरकारकडून मराठ्यांना आरक्षण मिळेल असा आशावाद व्यक्त केला.यावेळी जमा झालेल्या अन्नाची शिदोरी पॅकिंग करण्यासाठी तालुक्यातील तरुण मंडळी एकत्र येत यंत्रणा राबवली. तसेच समाज बांधवांनी एकत्र येत साहित्य नियोजनबद्ध जमा केले.”एक हात माणुसकीचा एक हात मदतीचा,” या अंतर्गत समाज बांधवांना आज दुपारी सोशल मीडियावर आव्हान करण्यात आले होते. त्या आव्हानाला समाज बांधवांनी भरभरून प्रतिसाद दिला. मुंबई येथील समाज बांधवांसाठी शनिवारी सायंकाळी स्वतंत्र शिदोरी पाठविण्यात आली.