*जिजामाता च्या पालक संघाची सहविचार सभा संपन्न*
दै.नगरशाही भेंडा वार्ताहर :-लोकनेते मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेच्या, जिजामाता माध्यमिक उच्च माध्यमिक व तांत्रिक विद्यालय ज्ञानेश्वर नगर भेंडा विद्यालयात शिक्षक – पालक संघाची सहविचार सभा संपन्न झाली .यावेळी सभेच्या अध्यक्षस्थानी शिक्षण संस्थेचे प्रशासकीय अधिकारी उपप्राचार्य भारत वाबळे सर होते .यावेळी सन 2025 – 26 या शैक्षणिक वर्षासाठी शिक्षक – पालक संघाची स्थापना करण्यात आली. पदसिद्ध अध्यक्ष या नात्याने अध्यक्षपदी प्राचार्य शिवाजी मुंगसे तर उपाध्यक्षपदी उपस्थित पालकांमधून बाबासाहेब आरगडे यांची निवड करण्यात आली .सहसचिव म्हणून ज्येष्ठ शिक्षक सुधाकर चव्हाण तर सहसचिव म्हणून राजेंद्र शिंदे ,सुखदेव चौधरी यांची निवड करण्यात आली .यावेळी शालेय कामकाजात येणाऱ्या आणि अडचणीवर चर्चा करण्यात आली .तसेच शिक्षक – पालक संघाची सभा त्रेमासिक घेण्यात येऊन विद्यालयाच्या कामकाजाचा आढावा घेण्यात येईल असे कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशासकीय अधिकारी भारत वाबळे यांनी सांगितले
.यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष ,उपाध्यक्ष ,सचिव ,सहसचिव यांचा सत्कार करण्यात आला .सौंदाळा गावचे सरपंच शरदराव आरगडे ,भेंडा खु!सरपंच वैभव नवले ,प्राचार्य शिवाजी मुंगसे यांची भाषणे झाली .कार्यक्रमाचे प्रस्ताविक व इतिवृत्त वाचन सुधाकर चव्हाण यांनी केले तर सूत्रसंचालन संजय भुसारी यांनी केले. यावेळी उपप्राचार्य कल्याण रुईकर, पर्यवेक्षक सूर्यकांत मोरे,गणेश आरगडे, दिपक वायकर,बाबासाहेब बोधक, लक्ष्मण आरगडे ,सागर मिसाळ ,सचिन आरगडे ,संजय आरगडे ,आबासाहेब मुळे ,मल्हारी कदम ,पंजाब शिंदे ,राजेंद्र आरगडे, श्रीमती जया कापसे ,श्रीमती मंजुश्री आढागळे, संगीता गव्हाणे, स्वरूपा देशमुख,मीना सदाफुले, सविता नवले, प्रा पाठक,टी एल फटांगरे,बापूसाहेब पाटील, बाळासाहेब उगलमुगले, सुधाकर नवथर ,उपस्थित होते.