18.6 C
New York
Monday, September 1, 2025

Buy now

spot_img

त्रिमूर्ती शैक्षणिक संकुल तेलकूडगाव येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात संपन्न

 

नेवासा प्रतिनिधी: समीर शेख

नेवासा तालुक्यातील तेलकूडगाव येथील त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलात ७९ वा स्वातंत्र्यदिन सोहळा उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वस्त अण्णासाहेब घाडगेपाटील उपस्थित होते.याप्रसंगी व्यासपीठावर विश्वस्त दादासाहेब घाडगे,मच्छिंद्र म्हस्के, मा.सरपंच काकासाहेब काळे,सतीश काळे, अरुण पाटील घाडगे,शरद काळे,बाबुराव काळे,शिवाजी घोडेचोर,सुरेश काळे, विलास काळे, नामदेव अण्णा घोडेचोर,काकासाहेब काळे,महेश काळे,अशोक काळे सर, बालकनाथ काळे,भानुमामा गटकळ,म्हातारदेव काळे,भाऊसाहेब शेंडगे,कराटे प्रशिक्षक अनिल मिसाळ, वसतीगृहातील पालक प्रतिनिधी प्रविण साळूंके, महिला पालक प्रतिनिधी समिंदराबाई दिवाण आदि मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


ध्वजारोहणाने कार्यक्रमाची सुरुवात झाल्यानंतर विद्यालयाचे सैनिकी प्रशिक्षक मेजर चितळे,मेजर बुटे यांच्या मार्गदर्शनाखाली त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलातील बालसैनिकांनी राष्ट्रध्वजाला परेड संचलनाद्वारे मानवंदना दिली. पावसाच्या व्यत्ययामुळे पुढील कार्यक्रम थांबवून खाऊ-वाटपाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाच्या प्रशासक मनिषा राऊत यांनी केले तर सूत्रसंचालन अतुल कराड व बाळासाहेब काळे,रेणूका काळे यांनी केले तर आभार विद्यालयाचे प्राचार्य भाऊसाहेब दुधाडे यांनी मानले.
सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी तेलकूडगाव संकुलातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

ताज्या बातम्या