भेंडा – (प्रतिनिधी )
हर घर तिरंगा अंतर्गत आज श्री मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेच्या जिजामाता माध्यमिक तांत्रिक व उच्च माध्यमिक विद्यालय ज्ञानेश्वर नगर भेंडा येथे दुसऱ्या दिवशीचे ध्वजारोहण समारंभ भेंडा बुद्रुक च्या उपसरपंच – सौ संगीता नामदेव शिंदे यांचे हस्ते पार पडले यावेळी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी उपप्राचार्य भारत वाबळे ,पत्रकार नामदेव शिंदे,प्राचार्य – शिवाजी मुंगसे उपप्राचार्य – कल्याण रुईकर ,पर्यवेक्षक आदिनाथ वावरे, पर्यवेक्षक – सूर्यकांत मोरे उपस्थित होते .
यावेळी सौ संगिता शिंदे यांच्या हस्ते विद्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले तसेच श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या 750 व्या जयंतीनिमित्त श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी मिरवणूक विद्यालयापासून ज्ञानेश्वर कारखाना कार्यस्थळावरील ज्ञानेश्वर मंदिरा पर्यंत काढण्यात आली त्या ठिकाणी सामुदायिक पसायदान एकत्रित गायले गेले पालखी सोहळ्यात बाबा महाराज सातारकर यांचा सुमधुर गायन केलेला हरिपाठ गायन,भगवे झेंडे विद्यार्थिनींनी डोक्यावर घेतलेले कलश यामुळे मिरवणूकीची शोभा वाढली.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्रीडाशिक्षक – संजय भुसारी , सुधाकर चव्हाण ,आप्पासाहेब काळे,गणेश आरगडे दीपक वायकर,अंबादास ननवरे,मीना सदाफुले, स्वरूपा देशमुख, अर्चना वाळेकर, बिलकीस शेख यांनी परिश्रम घेतले.