फुलारी हॉस्पिटल व स्वस्तिक नेत्रालय अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत नेत्र तपासणी
भेंडा (वार्ताहर ):– नेवासा तालुक्यातील भेंडा येथील फुलारी हॉस्पिटल व स्वस्तिक नेत्रालय अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबीरात २५५ रुग्णांची तपासणी करण्यात आली.
भेंडा येथील नागेबाबा संस्थानचे अंकुश महाराज कादे व महादेव महाराज घाडगे यांचे हस्ते या शिबिराचे उदघाटन झाले. जेष्ठ नेते लक्ष्मणराव शिंदे यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास
नगर येथील प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉ. प्रफुल्ल चौधरी,डॉ.ज्ञानेश्वर बहिरट, डॉ.कुलदीप पवार,डॉ. किशोर लांडे, डॉ.गणेश आर्ले,माजी जिल्हा परिषद दत्तात्रय काळे, माजी पंचायत समिती सदस्य अजित मुरुकुटे, डॉ.शिवाजीराव शिंदे,नामदेवराव निकम, किशोर मिसाळ, नामदेव शिंदे, किशोर भणगे, सोपान महापुर, वैभव नवले, चांगदेव तांबे, माधवराव काळे, श्रीपतराव फुलारी, पंढरीनाथ फुलारी, अशोक वायकर, अड.रवींद्र गव्हाणे, देवेंद्र काळे,किसन यादव, आबासाहेब काळे, अजित रसाळ, रमेश गोर्डे, नयन फुलारी,प्रदीप फुलारी,रामेश्वर गव्हाणे,
देवीदास शेंडगे,स्वस्तिक नेत्रालयाचे सागर गाडेकर,निलेश गवळी,किरण शिंदे यावेळी उपस्थित होते.
डॉ. संतोष फुलारी यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. अशोक पंडित यांनी सूत्रसंचालन केले. सुखदेव फुलारी यांनी आभार मानले.
———
फोटो ओली:—
नेत्र तपासणी करताना नगर येथील प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉ.प्रफुल्ल चौधरी.