20 C
New York
Tuesday, September 2, 2025

Buy now

spot_img

वोटचोरी विरोधात नेवाशात काँग्रेससह विविध संघटनाचा तहसील कार्यालयावर मोर्चा*

तहसील कार्यालयावर मोर्चा*

(नेवासा प्रतिनिधी ) :- वोट चोरीच्या निषेधार्थ आज काँग्रेस कमिटी व विविध संघटनाकडून नेवासा तहसील कार्यालयावर मोर्चा काढत मोदी सरकार व निवडणूक आयोगाचा निषेध करण्यात आला.
देशात झालेल्या लोकसभा निवडणूकित व चार राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतदान हेराफेरी झाल्याचे निष्पन्न झाले आहे.याविरोधात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बैंगलोर येथे पुराव्यासह आपले म्हणणे देशातील नागरिकांसमोर सादर केले. यात निवडणूक आयोग दोषी ठरला आहे. मागील निवडणूकामध्ये मोठया प्रमाणात मतदान चोरी होऊन भाजपा सरकार सत्तेत बसविण्यात आले आहे.याविरोधात राहुल गांधी यांच्या नेतृत्वात इंडिया आघाडीकडून दिल्ली येथे मोठे आंदोलन या आंदोलनात इंडिया आघाडीच्या नेत्यांना अटक करण्यात येऊन जेलमध्ये टाकले गेले.या घटनेचे देशभर पडसाद उमटले. आज नेवासा तालुक्यात काँग्रेस कमिटी, वंचित बहुजन आघाडी, भारतीय स्वाभिमानी संघ, प्रहार शेतकरी संघटना यांच्याकडून नेवासा तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी काँग्रेसचे संभाजी माळवदे यांनी मागील पार पडलेल्या लोकसभा व विधानसभा निवडणूका या रद्द करण्यात अशी मागणी केली.
शहराध्यक्ष अंजुम पटेल यांनी वोट चोरी विरोधात तालुक्यात मोठे जण आंदोलन उभारणार. वंचित बहुजन आघाडीचे पोपट सरोदे यांनी मोदी सरकार हे लोकशाही पद्धतीने आलेले सरकार नसून हे निवडणूक आयोगाने आणलेले हुकूमशाही सरकार आहे.गणपत मोरे यांनी भाजपा सरकारनी वोट चोरी करून संविधानाची हत्या केली असून संविधान वाचविण्यासाठी हा लढा आहे. प्रहारचे अध्यक्ष पांडुरंग औताडे यांनी सर्व समविचारी पक्ष व संघटना एकत्रित येऊन या विरोधात लढा देऊ असे स्पष्ट केले. या आंदोलनावेळी नेवाशाचे निवडणूक अधिकारी गोसावी साहेब यांच्याकडे मागील विधानसभा निवडणुकीचा झालेल्या मतदान संदर्भात डेटा मागणी करण्यात आली.तसेच यावेळी मोदी सरकार व निवडणूक आयोगाच्या निषेधाचे निवेदन तहसीलदार याना देण्यात आले.
या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे इरफान शेख,सतीश तऱ्हाळ, गोरक्षनाथ काळे,संजय वाघमारे,संजय होडगर, बाबासाहेब मिसाळ, विजय गोरे,गोरख बर्वे आदी उपस्थित होते.
*चौकट – नेवासा विधानसभा निवडणुक मतदान डेटाची मागणी*
वोट चोरी हा देशभरातील महाघोटाळा असून नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणूकित नेवासा तालुक्यात सुद्धा मोठया प्रमाणात बोगस मतदान झाल्याची शक्यता नाकरता येत नाही त्यामुळे निवडणूक अधिका-याने झालेल्या मतदानाचा डेटा उपलब्ध करून द्यावा. ज्यामुळे नेवासा तालुक्यात काही घोटाळा झाला असेल तर उघड करणे शक्य होईल – संभाजी माळवदे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी.

Related Articles

ताज्या बातम्या