5 C
New York
Sunday, December 7, 2025

Buy now

spot_img

भानस हिवरे येथे श्रीराम हायस्कूलमध्ये अब्दुल शेख यांच्या उपस्थितीत रक्षाबंधन उत्साहात साजरा

दै.नगरशाही नेवासा प्रतिनिधी :
भानस हिवरे (ता. नेवासा…)– जिल्हा मराठा प्रसारक मंडळाचे श्रीराम हायस्कूल, भानस हिवरे येथे शिक्षक व विद्यार्थिनींच्या आग्रहास्तव रक्षाबंधनाचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

विद्यालयाच्या मैदानात झालेल्या या कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापक सन्माननीय पवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. सर्व शिक्षक व शिक्षिका यांनी तयारी करून हा उपक्रम यशस्वी केला.

या वेळी रक्षाबंधनाचे सांस्कृतिक आणि सामाजिक महत्व स्पष्ट करण्यात आले. विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी विद्यार्थी कोणती जबाबदारी पार पाडू शकतात, यावर मार्गदर्शन करण्यात आले. अब्दुल शेख यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून गुरुवर्य व परस्पर आदर, सन्मान आणि सुरक्षिततेचे महत्व अधोरेखित केले. या वेळी अब्दुल शेख यांनी विद्यार्थिनी साठी केलेले सामाजिक कामाची दखल घेत शेख यांचा सन्मान करण्यात आला.

संपूर्ण कार्यक्रमात बंधुभाव, आपुलकी आणि शालेय कुटुंबातील एकोप्याचा सुंदर संदेश देण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस युवा नेते अब्दुल भैय्या शेख,शाळेचे मुख्याध्यापक दशरथ पवार सर, परिवेक्षक श्री.शेंडगे सर,शेटे सर, गरोळे सर,मस्के सर,बोरकड सर मा.मकरंद राजहंस ,जॉन्सन मकासरे,विश्वजित देशमुख,अभिरज अरगडे आदी उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या