17.2 C
New York
Tuesday, September 2, 2025

Buy now

spot_img

चिलेखनवाडीत रोड मॉडेल व्हिलेजच्या कार्यवाहीस प्रारंभ रोड मॉडेल व्हिलेज मध्ये सहभाग वाढवा – शरद पवळे

रोड मॉडेल व्हिलेज मध्ये सहभाग वाढवा – शरद पवळे दै.नगरशाही
भेंडा प्रतिनिधी-
राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याचा शेत रस्ता जोपर्यंत नकाशावर येत नाही, तोपर्यंत चळवळीचे काम थांबणार नाही. त्यासाठी रोड मॉडेल व्हिलेज मध्ये जास्तीत जास्त गावांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन शिव पाणंद शेत रस्ते चळवळीचे राज्य अध्यक्ष शरद पवळे यांनी केले.

शिव पाणंद शेत रस्ते चळवळीने राज्य शासनाकडे मागणी केल्यानुसार रोड मॉडेल व्हिलेज योजना कार्यान्वित झालेली आहे. या योजनेच्या नेवासा तालुक्यातील प्रत्यक्ष कार्यवाहीस सर्वप्रथम दि. 7 रोजी नेवासा तालुक्यातील चिलेखनवाडी येथे शेत रस्ते चळवळीचे प्रमुख , ग्रामस्थ आणि भुमी अभिलेख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जुना चिलेखनवाडी ते कुकाणा या रस्त्याच्या मोजणीस नारळ वाढवून प्रारंभ करण्यात आला.
मागील महिन्यात रोड मॉडेल व्हिलेज साठी चिलेखनवाडी ग्रामसभेत निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी शिव पाणंद तसेच रस्ते चळवळ चे कार्यकर्ते आणि सरपंच भाऊसाहेब सावंत यांनी पाठपुरावा केला होता. त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी चळवळीचे राज्य अध्यक्ष शरद पवळे यांचे अध्यक्षतेखाली चिलेखनवाडी येथील हनुमान सभामंडपात कार्यक्रम संपन्न झाला. त्याप्रसंगी चळवळीचे उपाध्यक्ष नाथा शिंदे, कारभारी गरड , नेवासा भूमिअभिलेखचे उपअधीक्षक संदीप गोसावी, सरपंच भाऊसाहेब सावंत, सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष शरद आरगडे ,सरपंच संदीप देशमुख,अशोक मंडलिक,दिनकरराव गर्जे आदींची प्रमुख उपस्थिती होती. चळवळीचे राज्य अध्यक्ष शरद पवळे म्हणाले की, चळवळीने राज्य शासनाकडे शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्व शेत रस्त्यांसाठी निवेदन देऊन योग्य ती कायदेशीर उपायोजना करण्याची मागणी केलेली आहे. गावपातळीवरील रस्ते समितीने यात पुढाकार घेऊन रस्ते खुले करणे आवश्यक आहे. कोणत्याही शेत रस्त्यासाठी पोलीस बंदोबस्त व मोजणी फी शासनाने माफ केलेली आहे. रस्ता मोजणी झाल्यानंतर जुन्या नंबरे ( दगड )लावावे, ते जर कुणी काढले तर त्याच्यावर 353 चा गुन्हा अधिकाऱ्यांनी नोंदवून कारवाई करावी .नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवपाणंद वं वहिवाटीचे रस्ते खुले करणे, मुर्मिकरण वं खडीकरण साठी सकारात्मक आदेश संबंधितांना देत आहेत.
यावेळी भूमी अभिलेखचे उपा संदीप गोसावी उपाध्यक्ष नाथा शिंदे, सरपंच शरद आरगडे, सरपंच दिनकरराव गर्जे, भाऊसाहेब सावंत, संदीप वाबळे, अंतरवालीचे सरपंच संदीप देशमुख, कारभारी गरड आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.
या प्रसंगी मा. सभापती अशोक मंडलिक, सामाजिक कार्यकर्ते अरुणराव मिसाळ,पत्रकार अनिल गर्जे, ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब काळे , निवृत्त शिक्षण अधिकारी बि.डी .पुरी ,तलाठी प्रियंका चव्हाण , पोलीस पाटील मंगल सावंत, मा.सभापती अशोकराव मंडलिक, सामाजिक कार्यकर्ते अरुणराव मिसाळ,पत्रकार अनिल गर्जे, ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब काळे , निवृत्त शिक्षण अधिकारी बि.डी .पुरी ,तलाठी प्रियंका चव्हाण , पोलीस पाटील मंगल सावंत, गावचे उपसरपंच नाथाभाऊ गुंजाळ ,
ग्रामपंचायत सदस्य सुहास गायकवाड, बाळासाहेब गुंजाळ , सुमंत कांबळे तसेच छबुराव कांबळे, मेजर संजय गुंजाळ, संजय कांबळे, माजी सरपंच सुशील कांबळे, विकास कांबळे ,शब्बीर इनामदार ,कैलास काळे ,सूर्यकांत पाडळे, मधुकर काटे, सुरेश कांबळे ,दत्तात्रय भातंबरे ,काशिनाथ गोसावी, राम पवार , निवृत्त मंडल अधिकारी रमेश सावंत ,संतोष भातंबरे, प्रवीण कांबळे, बाळासाहेब दळवी, राजू खंडागळे, कैलास सावंत ,रवी कांबळे ,रोहित कांबळे, जालिंदर गायकवाड ,विष्णू घाडगे , बाळासाहेब थोरात ,रमेश भक्त, प्रशांत चौधरी, विठ्ठल करमळ, साहेबराव आखाडे ,सचिन शेळके, संतोष शिंदे, गणेश कीड ,सुजय शिंदे , शेतकरी संघटनेचे मच्छिंद्र आर्ले ,चांगदेव शिंदे, , अनिल सरोदे, कानिफनाथ कदम, काशीराम घाडगे संभाजी आयनर आदी मान्यवर उपस्थित होते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिव पानंद शेत रस्ते चळवळीचे तालुक्यातील कार्यकर्ते व शेतकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Related Articles

ताज्या बातम्या