झेडपीचं बदली पोर्टल चालेना, शिक्षक झाले त्रस्त!
दै.नगरशाही
अहिल्यानगर विशेष प्रतिनिधी : जिल्हा परिषद शाळेतील
प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या वास्तविक पाहता मे, जून महिन्यात होणे अपेक्षित होते. परंतु ऑगस्ट महिना सुरु झाला आहे. तरी बदली प्रक्रिया पूर्ण नाही. संवर्ग १ व संवर्ग २ ची बदली प्रक्रिया पूर्ण झाली आहे. परंतु दिनांक ५ ते ८ ऑगस्ट दरम्यान संवर्ग ४ ची प्रक्रिया सुरू झाली आहे. परंतु ऑनलाईन सर्व्हर व्यवस्थित चालत नसल्याने शिक्षकांना माहिती भरणे अवघड झाले आहे. राज्यात ६ ते ८ ऑगस्ट पायाभूत चाचणी सुरू आहे. तसेच स्वांतत्य दिन कवायत , संचलन यांची तयारी करायची
की बदली फार्म भरायचा? असा
सवाल शिक्षकांकडून उपस्थित होत आहे.
त्यामध्ये ऑनलाईन फार्म भरण्याच्या
प्रक्रियेमुळे प्राथमिक शिक्षक
त्रस्त झाला आहे. राज्यस्तरीय
प्रक्रिया असल्याने स्थानिक
अधिकारीवर्गांनाही
काहीही माहिती नाही. संवर्ग ४
ची शिक्षक संख्या जास्त आहे.
त्यांचे योग्य नियोजन करावे. व
बदली फार्म भरण्यासाठी मुदतवाढ
मिळाली अशी मागणी शिक्षक संघटनेकडून होत आहे.