दै.नगरशाही नेवासा प्रतिनिधी/समीर शेख
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त, दिनांक __25 जुलै रोजी नेवासा तालुक्यातील नागापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शाखेचे उद्घाटन उत्साहात पार पडले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन युवा नेते अब्दुलभैय्या शेख यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले. या प्रसंगी नेवासा
तालुकाध्यक्ष अशोकराव मोरे,
मकरंदजी राजहंस,
बाबासाहेब नवथर,जिल्हा सरचिटणीस
विलासराव देशमुख,
सतीश कावरे,
वसंतराव कांगुणे,
संदीपजी लष्करे,
अशोकराव काळे,
अर्जुन कापसे,
अभिराज आरगडे,
पत्रकार संतोष औताडे,
विश्वजित देशमुख, तुषार काळे, ज्ञानदेव जावळे, राजू लवांडे इत्यादी उपस्थित होते.
नवीन शाखेचे पदाधिकारी:
शाखाध्यक्ष: राहुल लवांडे,
उपाध्यक्ष: बापू खरे
सचिव: भाऊसाहेब कापसे
सरचिटणीस: कृष्णा आढागळे,
सदस्य: आनंद वडागळे, आदेश भारस्कर, सचिन आढागळे आदींना मनःपूर्वक अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागापूर ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले.
कार्यक्रमाच्या निमित्ताने अजितदादा पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आणि त्यांच्या दूरदृष्टीने नेवासा तालुक्याचा सर्वांगीण विकास साधेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.