- . दै.नगरशाही भेंडा प्रतिनिधी: कुकाणा
(ता.नेवासा) येथे नागेबाबा पतसंस्थेच्या ७२ व्या अद्ययावत शाखेचे उद्घाटन सोमवार दिनांक १४ जुलै रोजी झाले.नागेबाबा पतसंस्था नेहमी वेगवेगळे उपक्रम राबवण्यात आघाडीवर असते . सामाजिक उपक्रमात पाथर्डी तालुक्यातील हनुमान टाकळी येथे गो-शाळा चालवणे , अहिल्यानगर येथे दवाखान्यात असणा-या रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांना मोफत जेवणाचे डबे दिले जातात सध्या दररोज डब्यांची संख्या ६०० वर पोहोचली आहे. नागेबाबा सभासद सुरक्षा योजनेतून आजपर्यंत २३५ सभासदांना साडेपाच कोटी रुपयांचा लाभ पतसंस्थेने मिळवून दिला आहे.
——————————————–
पैशांची गुंतवणूक म्हणजे कवड्यांचा खेळ नाही नागरिकांनी जादा व्याज दराच्या अमिषाला बळी न पडता सुरक्षित गुंतवणूक नागेबाबा पतसंस्थेत करावी अविरत सेवा देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत
कडूभाऊ काळे – अध्यक्ष नागेबाबा पतसंस्था
——————————————–
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी असिस्टंट सीईओ अक्षय काळे , रीजनल ऑफिसर यशवंत मिसाळ , रीजनल ऑफिसर पोपट जमदाडे , विकास अधिकारी कन्हैया काळे , शाखा व्यवस्थापक दिलदार शेख , मोहन वाघडकर , शाखा अधिकारी सुभाष उमाप ,गिरी साहेब,आदिंनी परिश्रम घेतले.
कुकाणा शाखेस सोपान घोडेचोर, ललित भंडारी, विष्णू पवार, दत्तू भाऊ काळे, अशोक वायकर,बाळकृष्ण पुरोहित, सुकदेव फुलारी, आबासाहेब काळे, संतोष फुलारी, राजेंद्र चिंधे, डॉ. शिवाजी शिंदे, बबन पिसोटे, भानुदास कावरे, रामनाथ गरड, योगेश वर्मा, डॉ. पांडुरंग कुलकर्णी, डॉ. गणेश आर्ले, हनीफ शहा, मुसाभाई ईनामदार, नबाब शहा, अशोक दरोडे, अभयशेठ बलाई, सुभाष चौधरी, गणेश गव्हाणे, अशोक चौधरी, ह.भ. प. ज्ञानेश्वर महाराज तांबे, सोमनाथ कचरे, गणेश पवार, शरद गोल्हार, संदीप रिंधे, सुभाष आवटी, अशोक मिसाळ, सुनील कचरे, किशोर फासे, प्रा. नारायण म्हस्के, प्राध्यापक संदीप फुलारी, राजेश वावरे, सुनिल पंडित,ईस्माइल शेख,ॲड. प्रकाश भागवत आदींसह परिसरातील नागरिकांनी भेटून शुभेच्छा दिल्या.