23.5 C
New York
Tuesday, July 15, 2025

Buy now

spot_img

सौंदाळा शाळा जिल्ह्यात शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये अव्वल*

*पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर……
सौंदाळा शाळा जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर* दै.नगरशाही भेंडा प्रतिनिधी :

दिनांक 9 फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेल्या सन 2024 पंचवीस मधील पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. यामध्ये अहमदनगर जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये नेवासा तालुक्याचे 31 विद्यार्थ्यांनी स्थान पटकावले असून त्यातील 20 विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या सौंदळा शाळेतील आहेत.
अहिल्यानगर जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये जिल्हा परिषदेत व्यवस्थापन अंतर्गत सर्वात जास्त म्हणजे 20 विद्यार्थी सौंदाळा शाळेतील निवडले गेलेले आहेत.
शाळेतील एकूण 81 विद्यार्थी या परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते त्यापैकी 66 विद्यार्थी या परीक्षेत पात्र झाले आहेत. आणि त्यापैकी वीस विद्यार्थी शिष्यवृत्ती मिळण्यासाठी पात्र त्यांची निवड झाली आहे. तसेच शाळेचा एकूण निकाल 81 टक्के लागला आहे.
यामध्ये प्रणम्य मापारी,क्षितिजा एडके,अभिनव नवले,सई घुले,गौरव कोठुळे,स्वरा बोर्डे,ध्रुवराज साळुंके,श्रावण पडोळ,सानिका घुले,आरोही म्हस्के,राजवर्धन नवथर,अर्जुन काळे या 12 विद्यार्थ्यांना वर्गशिक्षक म्हणून श्री रवींद्र पागिरे यांचे मार्गदर्शन लाभले.तर
समर्थ ढेरे,आर्य गोसावी,शौर्य काळे,आर्यवीर निंबाळकर,आरुषी गायकवाड,आयुष नवाळे,श्रुती दाभाडे,शुभ्रा कवडे या 8 विद्यार्थ्यांना वर्ग शिक्षक म्हणून श्री कल्याण नेहुल यांचे मार्गदर्शन लाभले.
गेल्या सहा ते सात वर्षापासून सौंदळा शाळा तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये शिष्यवृत्ती आणि नवोदय परीक्षेमध्ये अग्रेसर आहे. नुकत्याच यावर्षी झालेल्या नवोदय प्रवेश परीक्षेमध्ये सुद्धा सौंदळा शाळेचे आठ विद्यार्थी नवोदय विद्यालयासाठी निवड झाली होती. या सर्व यशामध्ये विद्यार्थ्यांची कठोर मेहनत पालकांचे सहकार्य व शिक्षकांची सातत्यपूर्ण मेहनत त्याचप्रमाणे मुख्याध्यापकांचे सूक्ष्म नियोजन पर्यवेक्षीय यंत्रणेचे प्रभावी नियोजन यांचा वाटा आहे.
या सर्व विद्यार्थ्यांना पूरक सौंदाळा शाळेतील श्री राजेश पठारे श्री किशोर विलायते श्रीमती भवानी बिरू श्रीमती कल्पना निघूट श्रीमती संजीवनी मुरकुटे यांच्याबरोबरच मुख्याध्यापक श्री पोपटराव घुले यांचे मार्गदर्शन लाभले.


याप्रसंगी भेंडा केंद्राचे केंद्रप्रमुख रवींद्र कडू पाटील,शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती मीरा केदार मॅडम त्याचप्रमाणे गटशिक्षण अधिकारी श्रीमती साईलता सामलेटी या सर्वांनी त्याचप्रमाणे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य तसेच सौंदाळा गावचे सरपंच शरद आरगडे, उपसरपंच व सर्व सदस्य त्याचप्रमाणे सौंदळा गावातील सर्व ग्रामस्थ आणि सर्व पालक वर्गाने अभिनंदन केले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या