*गोपाळपूरचा सुयोग सोनवणे सी.ए. परीक्षा उत्तीर्ण*
भेंडा – (प्रतिनिधी )
*दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडियाच्या वतीने मे 2025 मध्ये घेण्यात आलेल्या सनदी लेखापाल सीए अंतिम परीक्षेत सुयोग बापूसाहेब सोनवणे हा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाला .सुयोगचे प्राथमिक शिक्षण ग्रामीण भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोपाळपूर तालुका नेवासा येथे झाले. पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण जिजामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय भेंडा येथे झाले. त्यानंतर वाणिज्य शाखेतील अकरावी ते पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे येथील बीएमसीसी कॉलेजमध्ये झाले. अकरावीपासूनच सीए परीक्षेची तयारी सुरू केली होती. पाच वर्षांच्या कठोर प्रयत्नातून त्याने हे यश संपादन केले. सुयोग हा कुकाणा माध्यमिक विद्यालयाचे माजी प्राचार्य पी.डी.सोनवणे यांचा नातू तर नेवासा तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष – बापूसाहेब पुंजाराम सोनवणे यांचा मुलगा आहे. त्याने प्रथम प्रयत्नातच अंतिम परीक्षेत दैदीप्यमान यश मिळवल्याबद्दल त्याचे सोनवणे ,* *रायकर ,बोराटे ,जेजुरकर ,रसाळ, भागवत, लगे तसेच शिक्षक मित्र परिवाराकडून अभिनंदन करण्यात आले.