*नेवासा पोलिसांचा
*”मावा बनवणाऱ्या कारखान्यावर छापा”*”मावा बनवणाऱ्यावर कारवाई”*
नेवासा: प्रतिनिधी- या बाबत सविस्तर वृत्त की, शनीवार दिनांक 5 जुलै रोजी पोलीस निरीक्षक धनंजय अ. जाधव पोलीस ठाणे नेवासा यांना गोपनीय बातमीदारांकडून खबर मिळाली की, देवगाव तालुका नेवासा येथील अशोक दगडू जामदार हे त्याचे राहते घराच्या शेजारच्या पत्र्याच्या शेडच्या आडोशाला शरीरास अपायकारक असलेले व शासनाची बंदी घातलेले सुगंधित मावा तयार करण्याचे मशीन बाळगून असल्याबाबत माहिती मिळाली होती. अशा माहितीवरून नेवासा पोलीस ठाण्याकडील पोलीस उपनिरीक्षक मनोज अहिरे, हरिभभाऊ धाईतडक, दिलीप घोळवे, महिसमाळे यांच्या पथकाने दोन पंचांसमक्ष संशयित इसम अशोक जामदार याचे रहाते घरी छापा घातला असता मावा बनवण्याचे अंदाजे 10 हजार रुपये किमतीचे मशीन मिळून आले. याबाबत पोलीस ठाणे नेवासा येथे भारतीय न्याय संहिता कलम 223 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मावा बनवणारा इसम अशोक दगडू जामदार यांच्या अटकेची कारवाई पूर्ण करण्यात आलेली आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कल्लू बर्मे व उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव श्री. सुनील पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे नेवासाकडील अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.
छायाचित्र










