कुकाण्यात मोहरम विसर्जन मिरवणूक शांततेत, जातिय सलोखा जपत मोहरम साजरा… दै.नगरशाही नेवासा प्रतिनिधी : नेवासा तालुक्यातील कुकाणा येथे दरवर्षी प्रमाणे यंदाही मोहरम ताजिया, सवारी मिरवणूक उत्साहात साजरी करण्यात आली.सामाजिक सलोख्याचा संदेश देत यंदा आषाढी एकादशी व मोहरम एकाच दिवशी आल्याने हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांना मोहरम निमित्त शुभेच्छा दिल्या तर एकादशी निमित्त हिंदू बंधूना मुस्लिम बंधूकडून शुभेच्छा दिल्या.
मानाच्या मुजावर ताजियाला देशमुख कुटुंबाच्या वतीने मा.कृ.उ.बा.समितीचे उपसभापती वसंतराव देशमुख यांनी चादर अर्पण केली, यावेळी सामाजिक कार्यकर्ते हमीद नालबंद, मुजावर बालम शेख, पापाभाई शेख, याकुब शेख,आय्युब नालबंद फारूख तांबोळी,आदि उपस्थित होते.
मोहरम सवारीचे दर्शन ज्येष्ठ नेते अड.देसाई देशमुख, मा.सरपंच दौलत देशमुख,राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस विलास देशमुख, युन्नस नालबंद, लालाभाई शेख,ईस्माइल नालबंद,ईकबाल तांबोळी, शकुर शेख,शाकिर शेख, इन्नुस नालबंद, फिरोज शेख ,आरिफ तांबोळी, सरवर शहा,जावेद शेख,रऊफ नालबंद, अकबर तांबोळी,मुसाभाई तांबोळी, फैय्याज तांबोळी, जावेद तांबोळी, चांद मुजावर, पत्रकार समीर शेख, पत्रकार सुनिल पंडित, पत्रकार अनिल गर्जे,युवा नेते भारत गरड,मा.उपसरपंच भाऊसाहेब फोलाणे ,मा.सरपंच कारभारी गोर्डे यांनी शुभेच्छा दिल्या.
10 मोहरम निमित्त नवसाचे वाघ रंगविण्यात आले..
यावेळी
पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांचे नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोज आहिरे ,गुप्त वार्ता विभागाचे अरविंद वैद्य,हवालदार शहाजी आंधळे, पोलीस नाईक बाबासाहेब वाघमोडे, पो.का.धायतडक,पो.का.फाटक,पो.को.संदीप ढाकणे यांनी चोख बंदोबस्त ठेवला.