️
*कार-मोटर सायकल अपघातात दोन जण ठार*
दै.नगरशाही नेवासा प्रतिनिधी:-
सविस्तर हकिकत अशी की, शनिवार दिनांक 5 जून रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास ई सम नामे विक्रम भीमा आढाव राहणार शिरजगाव तालुका येवला जिल्हा नाशिक हे आपल्या दोन मित्रांसमवेत मित्राच्या मारुती रिट्स कारने भालगाव तालुका नेवासा येथे स्वतः करिता सेकंड हँड कार पाहण्यासाठी श्रीरामपूर कडून नेवासाकडे येत असताना पुनतगाव फाट्याच्या जवळ नेवासाकडून एका मोटर सायकलवर तिघेजण येत असताना मोटर सायकल घसरून पडल्याने ती कारखाली आली आल्याने दोघे जण कारखाली रगडले गेले व पाठीमागे बसलेला तिसरा इसम बाजूला फेकला गेला. कार चालकाने कार थांबून पाहिले असता दोघेजण गंभीर जखमी झालेले होते. कार चालक विक्रम भीमा आढाव हा आपले दोन्ही मित्रांसह रस्त्याने जाणाऱ्या दुसऱ्या वाहनाला हात करून पोलीस ठाण्यात आला व पोलिसांना अपघाताची माहिती दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी पोलीस ठाणे नेवासाकडील आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा डायल 112 कर्तव्य असलेले पोलीस कॉन्स्टेबल गोवर्धन पवार यांना तातडीने घटनास्थळी पाठवले तसेच मृतक व जखमी यांना तातडीने ग्रामीण रुग्णालय नेवासा येथे भरती केले. परंतु मोटर सायकल वरील गंभीर जखमी झाल्याने डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मृत झालेल्या झालेले दोघे 1. अमोल उर्फ शिवाजी भाऊसाहेब दारकुंडे वय 32 वर्ष 2. निवृत्ती न्यानेश्वर पवार वय 56 वर्ष दोन्ही राहणार पुनतगाव तालुका नेवासा असून मोटर सायकलवर बसलेला तिसरा व्यक्ती किरकोळ जखमी झालेला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक धनंजय अ. जाधव यांनी फौज फाट्यासह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मोटर सायकलवरील तिघेही दारू पिले असल्याचे नागरिकांनी सांगितले.
या घटनेच्या अनुषंगाने पोलीस ठाणे नेवासा येथे अकस्मात मयत दाखल झाला असून मोटर सायकलवरील दोन्ही मृतकांचा इंक्वेस्ट पंचनामा व पोस्टमार्टम कारवाई नेवासा पोलीस ठाण्याकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पवार यांनी पार पाडली.
सदरचा तपास पोलीस निरीक्षक धनंजय अ. जाधव यांचे मार्गदर्शनाखाली अमोल पवार पोलीस ठाणे नेवासा हे करीत आहेत.