29.4 C
New York
Tuesday, July 15, 2025

Buy now

spot_img

⛓️ *”सौर ऊर्जा पंप लावून देतो म्हणून शेतकऱ्यांच्या फसवणूक प्रकरणी नेवासा पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल”*

⛓️ *”सौर ऊर्जा पंप लावून देतो म्हणून शेतकऱ्यांच्या फसवणूक प्रकरणी नेवासा पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल”*
दै.नगरशाही
नेवासा प्रतिनिधी:-
या बाबत सविस्तर वृत्त असे की, शेतकऱ्यांच्या मोबाईलवर कॉल करून मी संदीप बोडके बोलत असून तुम्ही सौर पंप मिळणे करिता अर्ज केला आहे. तुमचा अर्ज मंजूर झालेला आहे. तुम्ही माझ्या फोन-पेवर अनामत रक्कम पाठवा. तुमचे पैसे आज पोहोच झाल्यावर उद्याच तुमचा सौर पंप बसवण्याचे काम करतो, अशी बतावणी करून अहिल्यानगर जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना फसवणाऱ्यास पोलिसांनी सिताफिने अटक केलेली आहे.
सविस्तर वृत्त असे की, प्रकाश पांडुरंग ढोकणे रा. गोपाळपूर ता. नेवासा जि. अहिल्यानगर यांना दिनांक 18 एप्रिल 2025 रोजी संदीप बोडके नावाच्या व्यक्तीने मोबाईलवर कॉल केला व तुम्ही सौर पंप मिळणे करिता अर्ज केला आहे. तुमचा अर्ज मंजूर झालेला आहे. तुम्ही माझ्या फोन-पेवर अनामत रक्कम पाठवा. तुमचे पैसे आज पोहोच झाल्यावर उद्याच तुमचा सौर पंप बसवण्याचे काम करतो. सुरुवातीस फिर्यादी प्रकाश ढोकणे यांनी प्रतिसाद दिला नाही. परंतु नंतर अनेकदा फोन करून इन्शुरन्सचे 3400/- रुपये फोन पे करा असे म्हणाला. त्यावर फिर्यादी प्रकाश ढोकणे यांनी संदीप बोडके यास फोन-पेवर सौर पंपाच्या इन्शुरन्सचे 3400 पाठवले. परंतु नंतर संदीप बोडके याने फोन घेण्याचे बंद केले. त्या नंतर फिर्यादी प्रकाश ढोकणे यांना संशय आला व त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले तसेच अधिक माहिती घेतली असता त्यांच्या ओळखीचे संदीप गव्हाणे रा. मसले, बाबा घुले रा. तरवडी व शरद गायकवाड रा. वाकडी यांची देखील फसवणूक झाल्याचे समजले. या फसवणुकी बाबत प्रकाश ढोकणे यांनी पोलीस ठाणे नेवासा येथे तक्रार दिल्याने संदीप दिलीप बोडके रा. टाकळीभान ता. श्रीरामपूर याच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
दरम्यान अशाच प्रकारची फसवणूक राहुरी तालुक्यातही झाली असल्याने पोलीस ठाणे राहुरी येथे देखील संदीप बोडके यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला आहे. संदीप बोडके यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अहिल्यानगर व राहुरी पोलिसांनी सिताफिने जायबंद केले आहे.
संदीप बोडकेवर यापूर्वी दरोड्याची तयारी सारखे गंभीर गुन्हे पोलीस ठाणे नेवासा येथे नोंद आहे.

ज्या शेतकऱ्यांच्या अशा प्रकारची फसवणूक झाली असेल त्यांनी त्यांच्या स्थानिक पोलीस स्टेशनला संपर्क करण्याचे आवाहन धनंजय अ. जाधव पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे नेवासा यांनी केले आहे.
सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घारगे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कल्लूबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे नेवासाकडील पोलीस हवालदार शहाजी आंधळे हे करीत आहेत

Related Articles

ताज्या बातम्या