दै.नगरशाही भेंडा वार्ताहर
श्री. मारुतरावजी घुले पाटील शिक्षण संस्था संचलित जिजामाता पब्लिक स्कूल ज्ञानेश्वरनगर भेंडा या शाळेतील विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेमध्ये यश मिळविले . यामध्ये प्रथम क्रमांक कु.आरुषी प्रवीण पंडुरे, तृतीय क्रमांक आयन जमीर पठाण चतुर्थ क्रमांक स्वयम गणेश आरगडे या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले या विद्यार्थ्यांच्या उत्तुंग यशाबद्दल शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष मा.आ.डॉ.नरेंद्रजी घुले पाटील, मा.आ.चंद्रशेखरजी घुले पाटील, मा.डॉ. क्षितीज घुले पाटील, विश्वस्त मा.आ. पांडुरंगजी अभंग साहेब, अॅड देसाई देशमुख, सचिव श्री. अनिल शेवाळे, श्री.रविद्र मोटे, प्रशासकिय अधिकारी प्रा.भारत वाबळे, प्रा.डॉ.राजेंद्र गवळी, उपप्राचार्य दिपक राऊत, सर्व शिक्षकवृंद, पालक व इतर सर्व मान्यवरांनी हार्दिक अभिनंदन व कौतुक केले आहे.