19.3 C
New York
Friday, September 5, 2025

Buy now

spot_img

जिजामाता विद्यालयात प्रवेशोत्सव दिन उत्साहात साजरा*

*जिजामाता विद्यालयात प्रवेशोत्सव दिन उत्साहात साजरा*
दै.नगरशाही भेंडा वार्ताहर:
श्री मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे, जिजामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात प्रवेशोत्सव दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मारूतरावजी घुले पाटील शिक्षण संस्थेचे प्रशासकीय अधिकारी प्रा.भारत वाबळे सर होते.
विद्यार्थ्यांनी ज्ञानाची कास धरावी .दर्जेदार शिक्षण घेऊन गुणात्मक दर्जा वाढवावा. जेणे करून भविष्यात चांगल्या विद्यालयात प्रवेश मिळेल. शाळेच्या पहिल्याच दिवशी उपस्थित झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे आपल्या मनोगतातून स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

विद्यालयाचे प्राचार्य शिवाजीराव मुंगसे यांनी घुले बंधूंनी टाकलेल्या विश्वासाला पात्र राहू असा विश्वास व्यक्त केला. विद्यार्थ्यांनी नवीन वर्षात संकल्प करावा व आपली प्रगती साधावी असे आवाहन केले.
मा.सरपंच नामदेव निकम यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थी व शिक्षकांनी शिस्तीचे पालन करून आदर्श घालून द्यावा असे आवाहन केले.
या प्रसंगी सर्व मान्यवरांचा विद्यालयातर्फे त्याचप्रमाणे इयत्ता पाचवीच्या सर्व विद्यार्थ्यांचा पाहुण्यांच्या हस्ते पेन, वही आणि गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी सरपंच किशोर मिसाळ, उपसरपंच नामदेवराव शिंदे, माजी सरपंच नामदेवरावजी निकम, राजेंद्र चिंधे ,राजेंद्र उगले ,दादा गजरे ,महेश निकम ,प्राचार्य शिवाजीराव मुंगसे, उपप्राचार्य कल्याणराव रुईकर ,पर्यवेक्षक आदिनाथ वावरे ,पर्यवेक्षक सुर्यकांत मोरे, बाळासाहेब उगलमुगले,तुकाराम फटांगरे ,अनिल जाधव सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सुधाकर चव्हाण यांनी तर आप्पासाहेब काळे यांनी आभार मानले.

Related Articles

ताज्या बातम्या