29.4 C
New York
Tuesday, July 15, 2025

Buy now

spot_img

नेवासात अवैध दारूसह ८६००० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त नेवासा पोलीसांची दमदार कामगिरी

*नेवासा पोलिसांनी केली अवैध दारू जप्त*

नेवासा प्रतिनिधी:- दिनांक 21 जून

शुक्रवार दिनांक 21 जून रोजी पोलीस निरीक्षक धनंजय अ. जाधव यांना गोपनीय बातमीदारामार्फत गोपनीय खबर मिळाली की, दोन इसम बजाज कंपनीच्या पल्सर मोटर सायकलवर मोठ्या प्रमाणावर देशी-विदेशी बेकायदेशीर दारू घेऊन जात आहेत.

अशा गोपनीय माहितीवरून तातडीने पोलीस हवालदार किरण गायकवाड व पोलीस नाईक भानुदास काळोखे यांना सदरची माहिती देऊन कारवाई करण्याचे आदेश दिले असता किरण गायकवाड व भानुदास काळोखे यांनी तातडीने अहिल्यानगर संभाजीनगर महामार्गावर नेवासा फाटा येथे नाकाबंदी सुरू केली. त्यावेळी गोपनीय बातमीदाराने दिलेल्या बातमीनुसार दोन्ही ईसम एका पल्सर मोटर सायकलवर आले. त्यांना थांबण्याचा ईशारा केला असता पळून जाऊ लागले. त्यांना सिताफिने ताब्यात घेण्यात आले. त्यावेळी त्यांच्याकडे पल्सर मोटर सायकलवर मोठ्या प्रमाणावर देशी विदेशी दारू घेऊन जात असल्याचे दिसून आले. दोघांना त्यांच्या नावाबाबत विचारपूस केली असता त्यांनी शुभम संजय यादव व सौरभ संजय साळवे दोन्ही रा. भेंडा ता. नेवासा असे सांगितले. सदरची देशी-विदेशी अवैध दारू दोन पंचांसमक्ष पंचनामा करून जप्त केली.

यामध्ये टूबर्ग कंपनीच्या बियर तसेच आयकॉन, मॅकडॉल, रॉयल चॅलेंज, ओल्डमाँक, इम्पेरियल ब्ल्यू, ऑफिसर चॉईस, गोवा टू इन वन इत्यादी देशी-विदेशी ब्रँड दोन पंचां समक्ष जप्त केले.

सदर बाबत पोलीस ठाणे नेवासा येथे दोन्ही आरोपीतांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार राठोड पोलीस ठाणे नेवासा हे करीत आहेत.

अवैध धंद्यांवर या पुढेही कठोर कारवाईचे धोरण अवलंबले जाईल असे पोलीस निरीक्षक धनंजय अ. जाधव यांनी पुन्हा एकदा सुतोवाच केले आहे.

सोबत:- छायाचित्र

Related Articles

ताज्या बातम्या