दै.नगरशाही भेंडा वार्ताहर:
श्री मारुतरावजी घुले पाटील शिक्षण संस्थेचे ,जिजामाता पब्लिक स्कूल मध्ये 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात आला. प्रथम प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रतिमांचे पूजन करण्यात आले. मानवी जीवनामध्ये योगाचे अनन्य साधारण महत्व आहे. योगामुळे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक पातळीवर अनेक सकारात्मक बदल घडून येतात म्हणून योग दिनाच्या निमित्ताने प्रा .सविता नवले यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व, फायदे, प्राणायाम त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे योग प्रात्यक्षिकाच्याद्वारे करून दाखवले व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी प्रा.डॉ राजेंद्र गवळी, उपप्राचार्य दीपक राऊत, उज्वला फटांगरे, सचिन गावडे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन रत्नमाला खराडे यांनी केले तर प्रा.डॉ.राजेंद्र गवळी यांनी आभार मानले
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!दै.नगरशाही वृत्तपत्र समूह