24.1 C
New York
Friday, July 18, 2025

Buy now

spot_img

मागासवर्गीय विद्यार्थ्याच्या उच्च शिक्षणासाठी ११००० रू अर्थसाहाय्य – सौंदाळा ग्रामपंचायतचा आदर्श उपक्रम

.नगरशाहीभेंडाप्रतिनिधी: मागासवर्गीय विद्यार्थ्याच्या उच्च शिक्षणासाठी ११००० रू अर्थसाहाय्य – सौंदाळा ग्रामपंचायतचा आदर्श उपक्रम
नेवासा तालुक्यातील नेहमी समाजहिताचे निर्णय घेण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या सौंदाळा ग्रामपंचायतने मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रत्येकी ११००० रू अर्थसाहाय्य केल्याचे लोकनियुक सरपंच शरद आरगडे यांनी सांगितले

सौंदाळा ग्रामपंचायतच्या वतीने सत्येश संजय गोरे हा विद्यार्थी अनंतरावं पवार इंजिनीरिंग व रिसर्च महाविद्यालय पुणे येथे इंजिनिअरींगचे शिक्षण घेत आहे त्यास ११००० रू चा धनादेश देण्यात आला तसेच शुभांगी रावसाहेब बोधक ही विद्यार्थीनी अमृतवाहिनी पॉलिटेक्निक महाविद्यालय येथे शिक्षण घेते तिला ११००० रू धनादेश देण्यात आला

सौंदाळा गावातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षणाचे प्रमाण खूपच कमी असल्यामुळे उच्च शिक्षणाचे प्रमाण वाढावे यासाठी ग्रामपंचायत कडुन ११००० रू देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे
यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक फी भरण्यास किंवा शैक्षणिक पुस्तकं आणि साहित्य खरेदीला मदत होणार आहे
मागासवर्गीय समाजात आजही मोठ्या प्रमाणात अज्ञान जास्त असल्यामुळे त्यांच्या पुढील पिढ्या देखील कमी शिक्षणामुळे त्यांच्यात नोकरी करणारे कमी व मोलमजुरी करणारे जास्त तरुण दिसतात हे चित्र बदलण्यासाठी शैक्षणिक सोईसुविधा पुरविण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतल्याचा आरगडे यांनी सांगितले

Related Articles

ताज्या बातम्या