कुकाणा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात नवगतांचे उत्साहात स्वागत! दहावीतील गुणवंतांचा सत्कार…. दै.नगरशाही कुकाणा प्रतिनिधी : ग्रामसेवा मंडळ संचालित कुकाणा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कुकाणा (ता. नेवासा) येथे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठीचा शाळा प्रवेशोत्सव, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार विठ्ठलराव लंघे पाटील हे उपस्थित होते. त्यांच्या मार्गदर्शनाने व उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
या कार्यक्रमास ग्रामसेवा मंडळाचे अध्यक्ष अड.
देसाई (आबासाहेब) देशमुख , रंजनबाई पवार, मा. मच्छिंद्र नाना कावरे,शिवसेनेचे तालुकाध्यक्ष संजय पवार, युवा नेते मा. किरण शिंदे, रामेश्वर शिंदे, प्राचार्य संभाजीराव देशमुख, उपप्राचार्य प्रकाशराजे भोसले, पर्यवेक्षक डगळे नारायण डगळे, तसेच शाळेतील शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमात नवागत विद्यार्थ्यांचे औपचारिक स्वागत करण्यात आले. गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. आमदार श्री लंघे पाटील यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करत गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर देण्याचे आवाहन उपस्थित विद्यार्थांना केले.