*जिजामाता पब्लिक स्कूल मध्ये नवगतांचे उत्साहात स्वागत व दहावी गुणवंतांचा सत्कार ..दै.नगरशाहीभेंडा प्रतिनिधी :*
*लोकनेते घुले पाटील शिक्षण संस्था संचलित जिजामाता पब्लिक स्कूल मध्ये नवीन विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. तसेच इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेमध्ये प्रथम तीन क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावरती प्रमुख पाहुणे म्हणून प्रशासकीय अधिकारी प्रा.भारत वाबळे, कृष्णा आरगडे ,सुधीर चक्रनारायण, दीपक चक्रनारायण, योगेश वर्मा ,प्रा.डॉ.राजेंद्र गवळी, उपप्राचार्य दीपक राऊत उपस्थित होते यावेळी प्रथमतः सर्व नवीन विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
प्रा.भारत वाबळे, दीपक चक्रनारायण यांनी नव्या शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. इयत्ता दहावी मध्ये क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थिनी प्रथम क्रमांक कु.हर्षिता वर्मा, द्वितीय कु.भराडे स्नेहल, तृतीय कु.चक्रनारायण प्रेरणा यांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रूपाली करंबळकर यांनी केले. तर शीला गिरीकुमार यांनी आभार मानले. या कार्यक्रम प्रसंगी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.*