दै.नगरशाही विशेष प्रतिनिधी :/गणेश घाडगे, समीर शेख
एका सर्वसामान्य गरीब कुंटूंबात जन्म झालेल्या साहेबांचा सुरूवातीचा काळ अतिशय कठिण परिस्थितीत गेला. अठराविश्व दारिद्रय असलेल्या त्यांच्या कुंटुंबामधील नऊ व्यक्तीमध्ये सुरूवातीच्या काळामध्ये कमावते फक्त आईवडिल होते. एवढे मोठे कुंटूंब चालवितांना आईवडिलांना असंख्य अडचणींना तोंड दयावे लागत होते. त्यामुळे सांहेबांच्या दोन भिवसेन पांडुरंग मोठया बंधूंना कुंटुंबाला मदत व्हावी यासाठी इच्छा असूनही शिक्षण घेता आले नाही. याच काळामध्ये कुंटुंबाला मदत होईल यासाठी साहेबही स्वतः शेतीच्या कामामध्ये हातभार लावायचे. साहेबांचे वडिल धार्मीक प्रवृत्तीचे होते परंतु साहेबांना ते कायम म्हणत की नावाप्रमाणेच तू मला साहेब होऊन दाखव आणि साहेबांनीही वडिल हयात असतांनाच त्यांचे हे स्वप्न सत्यात उतरविले.
साहेबांमध्ये अफाट प्रतिभाशक्ती आणि शिक्षण घेण्याची जिदद होती. कारण त्या काळात अत्यंत हालाखिची परिस्थिती असतांनाही उच्च पदावर विराजमान होण्याचे ध्येय डोळयासमोर ठेवणे म्हणजे अशक्यप्राय गोष्ट होती. परतुं साहेबांनी लहानपणासूनच त्यांचे ध्येय ठरविले होते आणि त्यादृष्टीने वाटचाल चालू केलेली होती यासाठी त्यांनी जिदद, चिकाटी आणि सातत्य ही यशाची त्रिसुत्री अंगीकारली होती. त्यांचे प्राथमिक शिक्षण तेलकुडगाव ता. नेवासा या त्यांच्या मुळ गावी तर माध्यमिक शिक्षण ढोरजळगाव ता. शेवगाव या ठिकाणी झाले. परतुं महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी आर्थिक परिस्थिती हालाखिची असल्याने कमवा आणि शिका या योजनेतून त्यांनी रा.ब.ना. बोरावके या महाविद्यालयातून बी.एस्सी पूर्ण केले. त्यानंतर अहमदनगर महाविद्यालयातून फिजीक्स इलेक्ट्रानिक्समधून एम.एस्सी. ही पदवी घेतली. महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी त्यांना महाराष्ट्र शासनाची शिष्यवृत्ती मिळाल्यामुळे खुपच मदत झाली. पदव्युत्तर पदवी घेतल्यानंतर त्यांनी इंडियन इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलाजी पवई येथे डी.आय. आय.टी. ही पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा ही पदवी घेतली.
शिक्षण पूर्ण झाल्यावर अनेक उच्च पदावर त्यांनी सेवा केली. यामध्ये सायन्स कॉलेज सातारा येथे अधिव्याख्याता म्हणून एक वर्ष, आय.ई.एस. केंद्रिय सेवा वर्ग 1 मधुन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून दोन वर्षे, भारतीय सैन्यात मेजर म्हणून चार वर्षे, प्रवरा अभियात्रिंकी महाविद्यालयामध्ये प्र. प्राचार्य / अधिव्याख्याता म्हणून चार वर्षे, एसटी महामंडळामध्ये विभाग निंयत्रक म्हणून तीन वर्षे व बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये सहा. आयुक्त म्हणून आठ वर्षे अशी 1978 ते 2000 या कालावधीमध्ये 22 वर्षे विविध उच्च पदावर सेवा केली. खेडेगावात जन्म होऊनही कोणत्याही प्रकारचे मार्गदर्शन नसतांना अशा अनेक उच्च पदावर विराजमान होणे हे आजच्या तरूण पिढीसाठी एक मोठे आदर्श उदाहरणच होय.
एवढ्या उच्च पदावर साहेबांनी सेवा करूनही त्यांचे मन कधीही नोकरीमध्ये रमलेच नाही कारण शिक्षण घेत असतांना त्यांना ज्या यातना सहन कराव्या लागल्या याची खंत त्यांच्या मनात कायम घर करून होती. समाजातील तळागाळातील गोरगरिब कुंटूंबातून जन्म घेतलेल्या व काहितरी करून दाखविण्याची जिद्द असणा-या मुलांमुलीसाठी काहितरी केले पाहिजे या उद्देशाने त्यांनी सन 1995 मध्ये त्रिमुर्ती पावन प्रतिष्ठान या धर्मदाय संस्थेची स्थापना केली. यासाठी त्यांच्या सुविदय धर्मपत्नी अॅड. सौ. सुमतीताई घाडगे पाटील यांनी खंबीर साथ दिली. यानंतर त्यांनी गावातील मुलांमुलींची शिक्षणासाठी हेळसांड होउ नये म्हणून सर्वप्रथम तेलकुडगाव या त्यांच्या मुळ गावी वडिलांच्या नावाने माध्यमिक विद्यालय सुरू केले. त्यांनतर त्यांनी श्रीरामपूर, त्रिमुर्तीनगर, शेवगाव, ढोरजळगाव, घोगरगाव, अ.नगर, विदर्भात वर्ध धामनगावरेल्वे येथे सर्व सोई सुविधांयुक्त भव्य अश्या वसतीगृहयुक्त शैक्षणिक संकुलांची उभारणी केली. यामध्ये विशेषतः त्रिमुर्तीनगर, ता. नेवासा या शैक्षणिक व सांस्कृतिक संकुलामध्ये 272 एकरामध्ये नारळ, आंबा, चिकु, पेरू अशा विविध प्रकारच्या असंख्य वृक्षांची लागवड करून रमनिय, मनमोहक परिसरामध्ये भव्य अशा शैक्षणिक इमारतींची उभारणी केली. त्रिमुर्तीचे विद्यार्थी सर्वगुणसंपन्न कसे होतील यासाठी सर्व ठिकाणच्या शैक्षणिक संकुलामध्ये भौतीक तसेच शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या. यामध्ये भव्य अशी मैदाने, रायफल शुटिंग हॉल, डिजीटल क्लासरूम ग्रंथालये, संगणक कक्ष, प्रयोगशाळा, खेळाचे सर्व प्रकारचे अत्याधुनिक साहित्य, कुस्तीहॉल, घोडेस्वारी, पॅरासिलींग अशा असंख्य सुविधा उपलब्ध करून दिल्या. ही शैक्षणिक संकुले उभी करतांना कोणत्याही प्रकारचा राजकिय वारसा नसल्यामुळे त्यांना असंख्य अडचणींना सामोरे जावे लागले. परतुं अशा परिस्थितीमध्ये न डगमगता जिद्दीने व स्वतःच्या कर्तृत्वाच्या जोरावर अद्ययावत 7 डी.एड.. 4 बी.एड. एम.एड. विधी महाविद्यालय, गृहविज्ञान महाविद्यालय, एसएनडीटीचे महिला महाविद्यालय, स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्र, मराठी व इंग्रजी माध्यमाच्या एकूण 15 शाळांची नउ शैक्षणिक संकुलांमध्ये उभारणी केली. आज सर्व शैक्षणिक संकुलामध्ये हजारो मध्ये विद्यार्थी शिक्षण घेत आहेत तर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी कार्यरत आहेत.
एवढे करूनही ते थांबले नाही समाजाचे आपण काहीतरी देण लागतो यासाठी अतिवृष्टीमध्ये घराची पडझड झालेल्या कुटूंबांना आर्थिक मदत, मंदिर उभारणीसाठी निधी, शहीद जवान व आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या मुलांना मोफत शिक्षण असे विविध सामाजिक कार्य ते करतच आहे. अहमदनगर जिल्हयामध्ये वारंवार दुष्काळ पडत आहे या जाणिवेतून 25 एकर व 40 एकरामध्ये 25 ते 30 फुट खोलीची सर्वसाधारणपणे ज्यामध्ये अर्धा ते पाउन टिएमसी जलसाठा होईल अशी दोन भव्य पाझरतलाव तयार केली. त्यामुळे परिसरातील आजूबाजूच्या किमान 1000 शेतक-यांना याचा फायदा होउन त्यांची शेतं हिरवीगार झालेली आहेत. आज ते शेतकरी सुखमय जिवन जगताना दिसत आहेत. एवढे मोठे कार्य करत असतांना त्यांना स्वतःसाठी तसेच कुंटूंबासाठी वेळ देता येत नाही. त्रिमुर्तीसाठी अक्षरशः त्यांनी स्वतःचे आयुष्य तन, मन, धनाने वाहून घेतले आहे.
![]()
साहेबांकडून शिकण्यासारखे व घेण्यासारखे खुप काही आहे. कारण त्यांच्यामध्ये असणारी शिस्तप्रियता, वक्तशिरपणा, खिलाडूवृत्ती, अफाट बुध्दीमत्ता, संघटनकौशल्य, प्रशासनकौशल्य, निर्णयक्षमता, उदारमतवादी धोरण, जबरदस्त इच्छाशक्ती क्षितीजापार दुरदृष्टी या गुणामुळे व प्रत्येक शैक्षणिक संकुलामध्ये त्यांनी स्वतः जातीने लक्ष दिल्यामुळे तसेच संकुलातील मुलांच्या अडचणी स्वतः जाणून घेउन त्यादृष्टीने उपाययोजना करत असल्यामुळे आज त्रिमुर्ती पावन प्रतिष्ठाण संस्थेने अत्यंत कमी कालावधीमध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये गरुडझेप घेतलेली आहे. अशा या कर्तृत्वसंपन् शिक्षण क्षेत्रातील कार्य सम्राट आद साहेबरावजी हरिभाऊ घाडगेपाटील यांना भाव पूर्ण श्रद्धांजली
पत्रकार गणेश राजेंद्र घाडगेपाटील
तेलकुडगाव 9975643250
8766878065