25.5 C
New York
Sunday, July 20, 2025

Buy now

spot_img

सौंदाळा तंटामुक्त समितीने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मिटवले वाद

लोकनियुक्त सरपंच बांधावर समाज सेवेचा ध्यास घेतलेला युवा सरपंच दै.नगरशाही भेंडा प्रतिनिधी:

नेवासा तालुक्यातील समाज हिताचे निर्णय घेण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या ग्रामपंचायतच्या तंटामुक्त समितीने नेवासा कोर्टात चालु असलेल्या शेतकऱ्यांचे वाद प्रत्यक्ष बांधावर जाऊन मिटवले आहेत अशी माहिती लोकनियुक्त सरपंच शरद आरगडे यांनी दिली आहे

शिव्या बंदीचा ठराव घेतल्यामुळे महाराष्ट्रात प्रसिद्ध झालेल्या ग्रामपंचायतच्या तंटामुक्त समितीकडे मोहन गणपत चामुटे यांनी अर्ज करून बांधवरून श्री दिलीप कृष्णा निमगिरे व सौ वंदना दिलीप निमगिरे यांच्याशी सतत वाद होत असल्याची तक्रार केली होती
त्या अर्ज वरून तंटामुक्त समिती अध्यक्ष वैशाली आरगडे यांच्या सांगण्यावरून सौंदाळा शिवार गट नं १२४/१ ड आणि गट नं १२३ येथे प्रत्यक्ष जाऊन पहाणी करून बांधावर तार बांधून बांध सरळ केला त्या नंतर सदर बांधावर तात्काळ पोल उभे करण्यास सांगून पोल उभे करण्यासाठी फक्की टाकून दिली

सदरचा वाद तंटामुक्त समितीच्या सांगण्यावरून चामुटे वा निमगिरे या दोन्ही कुटूंबातील व्यक्तींनी समोपचाराने समजून घेऊन एकमेकांना सहकार्य करून वाद मिटवले आहेत

यापुढे गावातील वाद कुठलेही राजकारण न पाहता निपक्षपणे मिटवण्यात येतील असे तंटामुक्त समिती सांगितले आहे

यावेळी तंटामुक्त समितीचे सदस्य कवी बाळासाहेब आरगडे, सौंदाळा सोसायटी चेरमन राजेंद्र चामुटे, बंडु आरगडे, रामकिसन चामुटे, मधुकर आरगडे, मछिंद्र आरगडे, रावसाहेब चामुटे,भागचंद चामुटे,चंद्रकांत चामुटे, ऍडव्होकेट किशोर चामुटे,ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण चामुटे दिपक चामुटे आदी उपस्थित होते

Related Articles

ताज्या बातम्या