26.2 C
New York
Friday, September 5, 2025

Buy now

spot_img

जिजामाता पब्लिक स्कूलची उज्वल निकालाची परंपरा कायम

 

भेंडा प्रतिनिधी: श्री. मारुतरावजी घुले पाटील शिक्षण संस्था संचलित जिजामाता पब्लिक स्कूल ज्ञानेश्वरनगर भेंडा या इंग्रजी माध्यमाच्या विद्यालयाचा इ.१०वीचा निकाल ९७.१४ टक्के लागला असून वर्मा हर्षिता योगेश ९०.०० % मिळवून प्रथम, चक्रनारायण प्रेरणा सुधीर ८९.८० % मिळवून द्वितीय व भराडे स्नेहल रविंद्र ८६.८० % मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला. एकूण ७० विद्यार्थ्या पैकी २५ विशेष प्राविण्य, २७ प्रथम श्रेणीत व १६ विद्यार्थी द्वीतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. या विद्यार्थ्यांच्या उत्तुंग यशाबद्दल शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष मा.आ.डॉ.नरेंद्रजी घुले पाटील, मा.आ.चंद्रशेखरजी घुले पाटील, मा.डॉ. क्षितीज घुले पाटील, विश्वस्त मा.आ. पांडुरंगजी अभंग साहेब, अॅड देसाई देशमुख, सचिव श्री. अनिल शेवाळे, श्री.रविद्र मोटे, प्रशासकिय अधिकारी प्रा.भारत वाबळे, प्रा.डॉ.राजेंद्र गवळी, उपप्राचार्य दिपक राऊत, सर्व शिक्षकवृंद, पालक व इतर सर्व मान्यवरांनी हार्दिक अभिनंदन व कौतुक केले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या