29.8 C
New York
Sunday, July 20, 2025

Buy now

spot_img

जिजामाता पब्लिक स्कूल मध्ये महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा*

दै.नगरशाही भेंडा प्रतिनिधी

आज दि. 1 मे रोजी श्री. मारुतरावजी घुले पाटील शिक्षण संस्थेच्या जिजामाता पब्लिक स्कूलमध्ये महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सर्वप्रथम महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून राष्ट्रगीत, ध्वजगीत व महाराष्ट्र गीताचे सामूहिक गायन करण्यात आले. प्रा. डॉ राजेंद्र गवळी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. शाळेचे उपप्राचार्य दीपक राऊत यांनी आलेल्या सर्व पालकांचे सहर्ष स्वागत करून भविष्यात शाळेची असणारी वाटचाल, उपायोजना, नवीन उपक्रम आणि प्रवेश प्रक्रिया याविषयी चर्चा केली.

यावेळी मंथन परीक्षेमध्ये यश मिळवलेले विद्यार्थी आरगडे सम्राट, जाधव शिलाज्ञा, शिरसिम स्वराली ,चिलगर अनुराग, देवकर तनुष्का, कानडे गौरव यां विद्यार्थ्यांना मंथन परीक्षेमध्ये यश संपादन केल्याबद्दल शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष कृष्णा आरगडे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले व विद्यार्थ्यांना वार्षिक निकालाचे वाटप करण्यात आले. यावेळी व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. शैक्षणिक वर्ष-2024-25 उत्तुंग यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष मा.आ.डॉ. नरेंद्रजी घुले पाटील साहेब, मा.आ.चंद्रशेखरजी घुले पाटील साहेब, मा.डॉ. क्षितीज घुले पाटील, मा.आ. पांडुरंगजी अभंग साहेब, अॅड देसाई देशमुख सेक्रेटरी श्री. अनिल शेवाळे, श्री.रविद्र मोटे, प्रशासकिय अधिकारी प्रा.भारत वाबळे व इतर सर्व मान्यवरांनी हार्दिक अभिनंदन करत कौतुक केले.

Related Articles

ताज्या बातम्या