- कुकाण्याचे सुपूत्र शिवाजी कचरे यांना महासंचालकांचे सन्मानचिन्ह..
कुकाणा प्रतिनिधी-
विभागात उत्तम कामगिरी, उल्लेखनीय सेवा, विशेष कामगिरीबद्दल दिल्या जाणाऱ्या पोलिस महासंचालक पदकांची यादी सोमवारी जाहीर झाली.
पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी या पदकांची घोषणा केली. राज्यातून एकूण ८०० पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना या पदकाने सन्मानित करण्यात आले.
नेवासा तालुक्यातील कुकाणा येथील सुपुत्र शिवाजी राजाराम कचरे यांचा या यादीत समावेश आहे,
त्यांनी छत्रपती संभाजी नगर शहर पोलीस ठाणे अंमलदार म्हणून उत्कृष्ट कार्य केल्याने त्यांना हा सन्मान मिळाला आहे, त्यांचे विविध स्तरावरून अभिनंदन होत आहे.