28.9 C
New York
Friday, July 18, 2025

Buy now

spot_img

पाणी वापर संस्था सक्षमीकरणासाठी अधिकारी-पदाधिकाऱ्यांनी एकोप्याने काम करण्याची गरज-कार्यकारी अभियंता सायली पाटील*

जलव्यवस्थापन कृती पंधरवाडया निमित्त पाणी वापर संस्था सक्षमीकरण चर्चासत्र संपन्न

भेंडा(वार्ताहर):– पाणी वापर संस्था सक्षमीकरणासाठी पाणी वापरकर्ता शेतकरी,संस्थांचे पदाधिकारी व जलसंपदा विभागाचे अधिकारी यांनी एकोप्याने काम करण्याची गरज आहे असे प्रतिपादन अहिल्यानगर मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता कु.सायली पाटील यांनी केले.

नेवासा तालुक्यातील भेंडा येथे जलव्यवस्थापन कृती पंधरवडा कार्यक्रम सन २००५ अंतर्गत मुळा पाटबंधारे विभागाने आयोजित केलेल्या “पाणी वापर संस्था सक्षमीकरण चर्चासत्र व कार्यशाळेत” अध्यक्षस्थानावरून सायली पाटील बोलत होत्या.
यशदाचे प्रवीण प्रशिक्षक जलमित्र सुखदेव फुलारी, कृषी शास्रज्ञ डॉ.अशोकराव ढगे, विजयाताई अंबाडे,उपअभियंता संदीप पवार, नानासाहेब अंबाडे, जगदंबा पाणी वापर संस्थेचे सचिव शाशिशेखर भोरे,समाज प्रबोधनकार चंद्रहास गवळी,बाबूलाल पटेल,रामराव भदगले, आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

*जलमित्र सुखदेव फुलारी* म्हणाले की,
महाराष्ट्र सिंचन पद्धतिचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा- २००५ हा कायदा आणि त्यातील तरतुदी शेतकरी व वापर संस्थांसाठी वरदान आहे. या कायदयाने शेतकऱ्यांना पाणी हक्क, समन्यायी पाणी वाटप,पिक स्वातंत्र्य व प्रकल्पातील उपलब्ध पाणी वाटपाचे हक्क दिलेले आहेत. पाणीपट्टी आकारणी दर ठरविणे व वसूलीचे अधिकार संस्थाना देण्यात आलेले आहेत.संस्थेने शासनाला नियमित पाणीपट्टी भरल्यास ५० टक्के परतावा मिळतो आणि आगाऊ पाणीपट्टी भरल्यास १० सूट मिळते.

*डॉ.अशोकराव ढगे* म्हणाले, पाण्याची उपलब्धता पाहून पीक रचना करावी, शेतीसाठी पाणी वापरताना जास्त पाणी म्हणजे जास्त उत्पादन हा गैरसमज आहे.
पिकांना पाणी त्यांच्या वाढीच्या संवेदनशील अवस्थेमध्ये देणे आवश्यक असते. पिकाला जास्त पाणी दिल्यामुळे जमिनीचे आरोग्य बिघडते व जमीन खारवट व क्षारपड होते. पिकांना पाणी देताना आधुनिक ठिबक,तुषार सिंचनाच्या पद्धती वापरल्या पाहिजेत.

*शशिशेखर भोरे* यांनी खडका येथील जगदंबा पाणी वापर संस्थेची कार्यप्रणाली व यशोगाथा सांगून संस्थेचे दप्तर कसे ठेवावे या बाबद मार्गदर्शन केले.तसेच पाणी वापर संस्थेमुळे शास्वत पाणी कोठा मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या कृषी उत्पादनात वाढ झाल्याचे नमूद केले.

*विजयाताई अंबाडे* म्हणाल्या की,पाण्याची नासाडी न होता सर्व शेतकऱ्यांना पाणी मिळेल याची काळजी अधिकारी आणि पाणी वापर संस्थांनी घ्यावी.

*कारभारी गरड* यांनी उत्तम कार्य करणाऱ्या पाणी वापर संस्थाचे कैतुक केले पाहिजे त्याच बरोबर कार्यक्षम संस्थांवर कारवाई केली पाहिजे.

समाज प्रबोधनकार चंद्रहास गवळी यांनी भारूडांच्या माध्यमातून पाणी बचतीचा संदेश दिला.

*पाणी वापर संस्था पदाधिकारी व मुळा पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांच्या मध्ये चर्चासत्र झाले.कार्यकारी अभियंता कु. सायली पाटील, उपविभागीय अभियंता संदीप पवार यांनी संस्था पदाधिकारी व शेतकऱ्यांच्या प्रश्नाना उत्तरे दिली.*
मुळा पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता श्री.कराळे, स्वप्नील देशमुख,श्री.पाटील, शाखाधिकारी जितेंद्र कावले, बिरबल दरोडे, कालवा निरीक्षक नितीन लांडे, युनुस शेख, सुमेध कोरडे, श्रीकांत करंजे, दीपक कचरे, पोपट दरंदले, सुनील तुपे, अतुल गायकवाड, रावसाहेब गायकवाड,विकास घोक्षे,श्रीमती ओहोळ, बापू काळे यावेळी उपस्थित होते.

प्रारंभी महाराष्ट्रगीत आणि जलगीत सादर करण्यात आले.
उपअभियंता संदीप पवार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कालवा निरीक्षक रावण ससाणे यांनी स्वागतगीत सादर केले. कालवा निरीक्षक संतोष राऊत व नितीन लांडे यांनी सूत्रसंचालन केले.

उपस्थितिताना जलप्रतिज्ञा देवून कार्यक्रमाची सांगता झाली.
शाखाधिकारी प्रदीप खर्से यांनी आभार मानले.

Related Articles

ताज्या बातम्या