30.3 C
New York
Wednesday, July 16, 2025

Buy now

spot_img

कोहीनूर राष्ट्रीय पुरस्कार राजेंद्र फंड यांना जाहीर

दै.नगरशाही
नाशिक प्रतिनिधी : दर्पणकार बाळशास्त्री
जांभेकर पत्रकार संघाच्या वतीने महाराष्ट्र दिनानिमित्त कोहीनूर राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. महेंद्र देशपांडे यांनी केली असून यामध्ये राहाता, जि. अहिल्यानगर येथील राजेंद्र सुंदरदास फंड (तालुका आरोग्य सहाय्यक) यांच्या आरोग्य व व्यावसायिक क्षेत्रातील कार्याची दखल घेवून त्यांना कोहीनूर राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा राष्ट्रीय पुरस्कार वितरण समारंभ रविवार, दि. ४ मे २०२५ रोजी सायं. ५.३० वा. विशाखा हॉल, कुसुमाग्रजशनिवार, दि.१२ एप्रिल २०२५

स्मारक, गंगापूर रोड, नाशिक येथे संपन्न होणार आहे.

हा कार्यक्रम प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिला /पुरुष यांचा या प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.

यामध्ये राजेंद्र सुंदरदास फंड यांचा समावेश असून त्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल विविध स्तरावरून अभिनंदन करण्यात येत आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन पत्रकार संघातर्फे करण्यात आले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या