नजिक चिंचोली येथील जंगलीबाबा यात्रेची उत्साहात संपन्न…
दै.नगरशाही नेवासा प्रतिनिधी- नेवासा तालुक्यातील मौजे नजिक चिंचोली येथील जंगलीबाबा यात्रेची उत्साहात सांगता जंगी कुस्तीच्या फडाने झाली.दोन दिवस शुक्रवारी संदल,छबीना मिरवणूक तर शनिवार दिनांक 12/04/2025 कुस्तीच्या लढतु रंगल्या.
शेवटची कुस्ती आर.पी.आय.जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांचे कडून स्व.लक्ष्मणराव पाठक यांचे स्मरणार्थ व यात्रा कमेटी,ग्रामस्थ 5100 रु.मल्ल शुभम जाधव नेवासा व अभिजीत वाघुले गोंडेगाव यांच्यात झाली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस चे युवा नेते अब्दुलभैय्या शेख, पसायदान उद्योग समूहाचे शिवाजी पाठक,शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष बाळूभाऊ पवार,मा.चेअरमन भागचंद चावरे,सलाबतपूर चे सरपंच अजहर शेख, बाळासाहेब पाठक,संजय पाठक,संजय आढागळे,भेंड्याचे सरपंच नामदेव निकम,सोनई सरपंच हरिभाऊ दरंदले,आरपी आय तालुकाध्यक्ष सुशिल धायजे, ,रविभाऊ औताडे,राजेंद्र पाठक,बापूसाहेब जाधव,उमेश चावरे,नयन फुलारी, हुसेन सय्यद,चांद सय्यद गोवर्धन पाठक, नितीन काकडे,मते काका आदि मान्यवरांच्या हस्ते बिदागी देण्यात आली.
यावेळी विष्णू पाठक, ,निकाळजे सर,लक्ष्मणदादा गाढे,भानुदास चावरे,ईसाक सय्यद,चिंचोली येथील ज्येष्ठ मंडळी, युवक व कुस्ती प्रेमी उपस्थित होते.
कुस्ती पंच म्हणून नारायण धाडगे,राजेंद्र पाठक,रामेश्वर सोनपुरे यांनी काम पाहिले.