दै.नगरशाही
कुकाणे प्रतिनिधी- ता.९ महात्मा ज्योतीराव फुले यांच्या जयंतीनिमीत्त कुकाणे ता. नेवासे येथे शुक्रवार ता.११ रोजी सकाळी १०:०० वा. ईद-मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
बस स्थानक जवळी मर्कज मस्जिद सांस्कृतिक भवनात होणाऱ्या या कार्यक्रमासाठी आमदार विठ्ठल लंघे, माजी आमदार पांडुरंग अभंग, ज्येष्ठ नेते अँड देसाई देशमुख,भैय्यासाहेब देशमुख यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहे तरी सर्व ग्रामस्थ बांधवानी उपस्थित राहण्याचे आवाहन जामा मस्जिद पंच कमिटी ट्रस्ट चे अध्यक्ष रज्जाकभाई इनामदार, राष्ट्रवादीचे युवा नेते अब्दुलभाई शेख, मुसाभाई इनामदार, सलीम शाह, मतीन इनामदार, शकुर शेख यांनी केले आहे.