26.2 C
New York
Sunday, April 20, 2025

Buy now

spot_img

पालकांनी सौंदाळाच्या गुरुजींना दिली पल्सर गाडी भेट*

सत्काराने गुरुजी भारावले …
दै .नगरशाही नेवासा प्रतिनिधी-

शैक्षणिक गुणवत्तेच्या बाबतीत जिल्ह्यात अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सौंदाळा या शाळेत आज पुन्हा एक नवीन उपक्रम बघावयास मिळाला.
इयत्ता पाचवीच्या वर्गाचे वर्गशिक्षक श्री रवींद्र पागिरे सर यांच्या वर्गातील तब्बल पाच विद्यार्थ्यांची नवोदय विद्यालय साठी निवड तसेच इतर 15 ते 20 विद्यार्थ्यांची विविध खाजगी व शासकीय स्पर्धा परीक्षेत उत्तुंग यश मिळाल्यामुळे वर्गातील सर्व पालकांनी वर्गशिक्षक श्री रवींद्र पागिरे सर यांना बजाज पल्सर ही सुमारे एक लाख वीस हजार रुपये किमतीची गाडी भेट म्हणून दिली.
दरवर्षीच नवोदय विद्यालयात वगैरे सरांचे विद्यार्थी निवड होत असतात सन 2018 पासून आतापर्यंत जवळपास 20 विद्यार्थ्यांना त्यांनी नवोदय विद्यालयात शिक्षणासाठी पाठवले आहे.


विद्यार्थ्यांप्रती असलेल्या कर्तव्य भावना तसेच आपल्या स्वतःच्या कौटुंबिक व इतर वेळाची परवा न करता शाळेसाठी योगदान देणाऱ्या या शिक्षकाला वर्गातील विद्यार्थी व पालकांकडून मिळालेली ही अनमोल भेटवस्तू चर्चेचा विषय ठरत आहे.
याप्रसंगी पालकांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की गेल्या एक एप्रिल पासून पागिरे सरांनी विद्यार्थ्यांचे नवोदय शिष्यवृत्तीचे जादा तास घेतले तसेच मागील उन्हाळ्यात सरांनी एक दिवसही सुट्टी घेतली नाही.तसेच मागच्या 13 मे रोजी सरांचा अपघात झाला असतानाही सर दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांचा जादा तास घेण्यासाठी शाळेत उपस्थित होते.
आज या प्रसंगी कार्यक्रमासाठी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री शिवाजी कराड हे अध्यक्षस्थानी तर सौंदळा गावचे सरपंच व इतर मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी पाचवीच्या पालकांनी शाळेतील सर्व शिक्षकांना भेटवस्तू देऊन सन्मान केला.
यावेळी पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने गटशिक्षणाधिकारी विस्तार अधिकारी रुकसाना शेख मॅडम केंद्रप्रमुख कडू पाटील साहेब मुख्याध्यापक घुले सर त्याचप्रमाणे अहमदनगर जिल्हा शिक्षक बँकेचे माझी चेअरमन श्री रामेश्वर चोपडे तसेच संचालक श्री राजेंद्र मुंगसे केंद्र शाळेतील इतर मुख्याध्यापक श्री अंधारे सर श्री सुनील गायकवाड सर श्री नितीन दळवी सर श्रीमती लतिका कोलते मॅडम श्री सूर्यकांत कदम सर यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सौंदळा गावचे सरपंच श्री शरद आरगडे त्याचप्रमाणे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रेखा भारत आरगडे ग्रामपंचायत सदस्य बबन आरगडे उपसरपंच गणेश आरगडे बाळासाहेब बोधक यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पालकांमधून श्रीमती तृप्ती मापारी, मनीषा काळे अलिषा पडोळ सोनाली नवथर सुवर्णा नवले, श्री गणेश घुले सर श्री अशोक कोठुळे, श्रीमती कोठुळे हे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री राजेश पठारे सर यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सौंदाळा शाळेचे मुख्याध्यापक श्री पोपट घुले सर श्री किशोर विलायते सर आदर्श शिक्षक श्री कल्याण नेहुल सर, श्रीमती कल्पना निघुट मॅडम श्रीमती संजीवनी मुरकुटे मॅडम श्रीमती भवानी बिरू मॅडम यांचाही पालकांकडून सत्कार करण्यात आला.

Related Articles

ताज्या बातम्या