दै.नगरशाही नेवासा प्रतिनिधी- नेवासा तालुक्यातील कै. प्रा. दिनकरराव टेकणे , माजी प्रशासकीय अधिकारी श्री. मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था भेंडा बु. यांच्या चतुर्थ पुण्य स्मरणार्थ श्री. मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांच्या शुभहस्ते अध्यापक टेकणे संतोष दिनकरराव यांनी माळीचिंचोरा येथील गहिनीनाथ मंदिराच्या सभा मंडपाच्या जीर्णोद्धार करण्या करिता ३१०००/_ ( एकतीस हजार रूपये) देणगी माजी जिल्हा परिषद सदस्य शेंडे तुकाराम शेंडे यांचेकडे दिली. या निमित्ताने ह. भ. प. श्रीधर महाराज पुंड यांचे अप्रतिम अशी प्रवचन सेवा झाली .
या वेळी माजी प्राचार्य भैय्या साहेब देशमुख, कर्डक सर. नवले सर. माजी सरपंच एकनाथ धानपुने, चिंधे सर, रविद्र मोटे साहेब, भेंडा व माळीचिंचोरा परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.