नेवासा पोलीसांनी अवैध रित्या चोरट्या वाळु वाहतुकीवर केली कारवाई
दै.नगरशाही नेवासा प्रतिनिधी- या बाबत सविस्तर वृत्त असे की
दिनांक ३१.०३.२०२५ रोजी दुपारी ०७.०० वाजण्याच्या सुमारास परिवक्षाधीन पोलीस उपअधीक्षक श्री. संतोष खाडे यांना नेवासा पोलीस स्टेशन हद्दीमधील देवगाव गावाचे शिवारामध्ये एका बंपरमधुन वाळु वाहतुक होणार आहे अशी खात्रीलायक बातमी मिळाल्याने तात्काळ पोसई शैलेंद्र ससाणे, पोना/१७३ बी.बी. काळोखे, पोना/१३८० बाबासाहेब वाघमोडे, पोको १०२ वाल्मिक बाप, पोकों/२७५ संदीप ढाकणे, पोकों/१६९७ गणेश फाटक अशा पोलीसांचे पोलीस पथक तयार करुन त्यांना सदर ठिकाणी पंचासह जावुन छापा टाकून कारवाई करणेबाबत मार्गदशर्न व सुचना देवुन शिताफीने छापेमारी करुन गुन्हे दाखल करण्यावाचत आदेशीत केले होते. त्यानुसार सदर पथकाने पोलीस स्टेशन नेवासा हद्दीमधील मिळालेल्या माहिती नुसार कुकाणा ते देवगाव ता. नेवासा जि. अहिल्यानगर अशा जाणाऱ्या मार्गावर सापळा रचून सदरच्या वाहनाचा मागोवा घेतला असता सदरचे वाहन देवगावकडुन एक वाळूने भरलेला डंपर घेताना दिसल्याने त्यास पोसई शैलेंद्र ससाणे यांनी सदर कंपरला हात दाखवून थांबण्याचा ईशारा केला असता, सदर डंपरच्या चालकाने त्याचा इंपर न थांबवता पुढे घेवून गेला त्यादरम्याण सदर पोलीस पथकाने त्यांच्याकडील वाहनाने डंपरचा पाठलाग करुन काही अंतरावर डंपर पकडून त्यास थांबवले असता, त्यावरील बंपर चालकास त्याचे नाव गाव विचारले असता, त्याने त्याचे नाव सोमनाथ लक्ष्मण पवार, वय ३६ वर्षे, रा. खडका ता. नेवासा जि. अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले त्यास वाळु कोतून आणली याबाबत विचारणा केली असता त्याने सदरची वाळू ही गोदावरी नदीच्या पात्रातून आणली असलेचाचत सांगून त्याबाबत त्याच्याकडे कसलाच परवाना नसल्याचे सांगून सदर आरोपी हा पासिंग क्रमांक MH १६ AE ०९६१ या क्रमांकाच्या इंपरमध्ये अंदोजे ०३ ब्रास बाळूची चोरटी वाहतुक करीत असताना एकुण १५,४५,०००/- रुपयांच्या मुद्देमालासह मिळून आल्याने त्याच्याविरुध्द पोकों/वाल्मिक जालोदर वाघ यांनी फिर्याद देवून गुन्हा दाखल केला असून त्याचा तपास पोना/बी.बी. काळोखे हे करीत आहेत-
तरी यापुढे पोलीस स्टेशन नेवासा हद्दीमध्ये अशाच प्रकारे अवैध वाळू चोरी, अवैध रित्या बाजुची चोरटी वाहतुक करणारे, अवैध धंदे चालकांवर छापेमारी करुन कठोर कारवाई करण्यात येणार असुन ज्या व्यक्तीवर एकापेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत त्यांच्याविरुध्द हडपार सारखी कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच यापुढेही अशाच प्रकारे अवैध धंदे चालकांवर कारवाई चालु राहणार आहे असे ठणकावून सांगितले.
सदरची कारवाई मा.श्री. राकेश ओला सो पोलीस अधीक्षक अहमदनगर, मा. श्रीम. वैभव कलुबमें अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर व उप विभागीय पो. अधिकारी श्री. सुनिल पाटील शेवगाव उपविभाग यांचे सुचना मागदर्शनाखाली नेवासा पोलीस स्टेशनचे परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष आ. खाडे व धंनजय अ. जाधव पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन नेवासा यांनी व त्यांचे पथकातील अधिकारी पोलीस उपनिरीक्षक शैलेंद्र ससाणे, पोना/बी. बी. काळोखे, पीना बाबासाहेब वाघमोडे, पोको वाल्मिक वाघ, पोकों/संदीप ढाकणे, पोकों/गणेश फाटक यांनी केलेली आहे.