दै.नगरशाही कुकाणा प्रतिनिधी- समीर शेख : नेवासा तालुक्यातील कुकाणा येथे मानवतेचा संदेश देत ईद-उल-फित्र रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मौलाना ईमरान शेख यांनी खुदबा पठण व दुवा करून मानवतेचा संदेश देत एकमेकांवर विश्वास ठेऊन, इतरांशी प्रेमाने, सहकार्य करून सामाजिक शांतता राखण्याचे आवाहन उपस्थित बांधवांना केले.मौलाना शमशाद पठाण यांनी नमाज अदा केली.
यावेळी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी मा.सरपंच एकनाथ कावरे, नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दौलतराव देशमुख,पत्रकार बाळासाहेब सरोदे,,राष्ट्रवादी कांग्रेस चे विलास देशमुख, अनिल गर्जे,युवा नेते अमोल अभंग, सावता परिषदेचे राहुल जावळे,मा.उपसरपंच भाऊसाहेब फोलाणे,उपसरपंच सोमनाथ कचरे,पत्रकार सुनिल पंडित, देविदास गरड, मुकुंद अभंग ,मनसेचे किरण शिंदे आदि उपस्थित होते. यावेळी जामे मस्जिद चे अध्यक्ष प्रा.रज्जाकशहा इनामदार, प्रा. शकुर शेख, सलिमशहा इनामदार,सुयोग लॉन्स चे संचालक मुसा इनामदार, ईन्नुस नालबंद,ईकबाल इनामदार,मतीन इनामदार,समीर पठाण,आरिफ तांबोळी, जमाल शेख,जावेद शेख,अकील तांबोळी,ईस्माइल नालबंद,कदिर नालबंद,मुन्ना शेख,लतीफ सय्यद, जुबेर नालबंद,ईकलाख शहा,आरिफ पठाण, वसीम शेख ,गुलाब सय्यद आदिसह मुस्लिम युवकांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी शेवगाव चे उपविभागीय पोलिस अधिकारी सुनिल पाटील , परिविक्षाधीन डीवायएसपी संतोष खाडे,पीआय धनंजय जाधव, पोलिस उपनिरीक्षक शैलेद्र ससाणे, पो.का.वाल्मिक वाघ,पो.कॉ. ,पो.कॉ. पो.कॉ. बाबासाहेब वाघमोडे ,पो.कॉ. संदिप ढाकणे यांनी चोख बंदोबस्त ठेवला.