*भेंडा प्रतिनिधी-
लोकनेते मारुतरावजी घुले पाटील शिक्षण संस्था संचलित जिजामाता पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी गणित, विज्ञान व इंग्रजी ओलंपियाड मध्ये उज्वल यश संपादन केले. या परीक्षेसाठी शाळेतील ६७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यातील पाच विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल व प्रमाणपत्र मिळाले तर १६ विद्यार्थीना विशेष प्राविण्य मिळाले.
या परीक्षेमध्ये कु मनस्वी गोरे, ओवी खरड, श्रुती शेंडे, स्वरित खामकर, गौरी चौधरी, यांनी गोल्ड मेडल व शौर्या वेताळ, अभिनव कांबळे, अरफान पटेल, श्रीजय कोलते, मानसी मोरे, धनश्री पवार, सोनम वाघ, समीक्षा गरड, यांनी प्रथम क्रमांक मिळवून विशेष प्राविण्य मिळवले व निश्चय स्कॉलरशिप परीक्षेमध्ये मानसी कोलते हीने गोल्ड मेडल व प्रथम क्रमांक पटकावून शाळेचा गौरव वाढवला. जिजामाता पब्लिक स्कूल मध्ये शालेय अभ्यासक्रमासोबत विदयार्थ्यांना विविध स्पर्धात्मक, ज्ञानात्मक सामान्यज्ञान वृद्धिंगत करणारया परीक्षामध्ये सहभागी होण्यास संधी मिळते त्यातून विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास होतो व विद्यार्थ्यांना शिक्षणात गोडी निर्माण होते. या विदयार्थ्यांना शिक्षिका अश्विनी गरड, रेखा तरटे, जयश्री उंडे, राणी स्वामी, शिला गिरीकुमार,रूख्मिणी वेताळ, रुपाली करंबळकर, जयश्री थोरे, अनुजा पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.आ.डॉ.नरेंद्रजी घुले पाटील, मा.आ. चंद्रशेखरजी घुले पाटील,
मा.डॉ. क्षितीज घुले पाटील ,
विश्वस्त मा.आ.पांडुरंग अभंग, ॲड.देसाई देशमुख, सचिव अनिल शेवाळे, रवींद्र मोटे, प्रशासकीय अधिकारी प्रा. भारत वाबळे, प्रा.डॉ. राजेंद्र गवळी, उपप्राचार्य दीपक राऊत, शिक्षक वृंद, पालक, ग्रामस्थ, मित्रपरिवार व विद्यार्थी यांमधून अभिनंदन होत आहे.