..सर्व 21जागांवर स्वाभिमानी परिवर्तनाची एकहाती सत्ता
दै.नगरशाही अहिल्यानगर प्रतिनिधी-
माध्यमिक शिक्षक सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत 2025-2030
साठीच्या पंचवार्षिक निवडणुकीत स्वाभिमानी परिवर्तन मंडळाने सर्व२१ जागा जिंकत ऐतिहासिक विजय मिळवला. तब्बल २५ वर्षानंतर एकहाती सत्ता काबीज करत सत्ताधारी पुरोगामी सहकारी मंडळाला जबरदस्त धक्का देत स्वाभिमानी परिवर्तन मंडळाने २१ जागांवर विजय मिळवला. सत्ताधारी पुरोगामी सहकारी मंडळ विरोधात स्वाभिमानी परिवर्तन मंडळ अशी सरळ लढत झाली. माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या निवडणुकीतील 21 जागांसाठी 44 उमेदवार रिंगणात उतरले होते.
रविवारी दि. २३ रोजी माध्यमिक शिक्षक सोसायटी निवडणुकीची प्रक्रिया पार पडली. मतदान प्रक्रियेला उदंड 94 टक्के प्रतिसाद मिळाला होता, त्यामुळे निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सोमवार दि.
२४ रोजी निवडणूक निर्णय अधिकारी गणेश पुरी
यांचे नेतृत्वाखाली मतमोजणीसाठी 250 कर्मचारी यांनी काम केले.
निवडणूकीसाठी सहकार विभागाच्या वतीने एस.पी.बनसोडे, अल्ताफ शेख, संतोष वासकर,सयाजी होळकर, महेंद्र घोडके यांनी निवडणूक मतमोजणी सहकार्य केले.
शिक्षकांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असणाऱ्या माध्यमिक शिक्षक सोसायटीची पंचवार्षिक मतदान निवडणूक प्रक्रिया रविवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत शांततेत पार पडली. यंदा पहिल्यांदा ही निवडणूक अत्यंत शांततापूर्ण वातावरणात पार पडली असून शिक्षक संघटनांनी निवडणुकीच्या काळात एकमेकांवर जाहीर आरोप करण्याचे टाळत ही निवडणूक त्यांच्या वर्तुळापर्यंत सिमीत ठेवण्यात यश मिळवले असल्याचे समोर आले.
सत्ताधारी भाऊसाहेब कचरे पुरस्कृत पुरोगामी मंडळाच्या विरोधात परिवर्तन मंडळाच्या अप्पासाहेब शिंदे,बाबासाहेब बोडखे,जुनी पेन्शन चे राज्य संयोजक महेंद्र हिंगे,सुनिल दानवे,राजेंद्र लांडे,मुख्याध्यापक सुनिल पंडित, दत्तात्रय नारळे,प्रा.सुभाष कडलक,ज्ञानेश्वर काळे,अप्पासाहेब जगताप उद्धवराव सोनवणे यांनी जोरदार प्रचार करत 25 वर्षाच्या एकहाती सत्तेला सुरूंग लावला.
नेवासे तालुक्यातील त्रिमूर्ती संकुलाचे प्राचार्य सोपान काळे यांचा निसटता पराभव झाला. नेवासा ,येथे साधारण मतदार संघातील जास्त मते बाद ठरली.
नविन परिवर्तन मंडळाने आपल्या जाहिर नाम्यात दिलेल्या कर्ज मर्यादा टप्प्याने 30 लाखाच्या पुढे,ऑडिट फीत कपात,सोसायटीत राजकीय व्यक्ती हस्तक्षेप नको, होम लोन,इत्यादी आश्वासने पाळावीत व सभासदांचे हीत जोपासावे अशी सभासदांची अपेक्षा आहे.