18.3 C
New York
Sunday, April 20, 2025

Buy now

spot_img

माध्यमिक शिक्षक सोसायटीसाठी उच्चांकी मतदान…नेवासे येथे 97% ‌मतदान*

 

नेवाशात 97%मतदान

दै.नगरशाही अहिल्यानगर प्रतिनिधी:/समीर शेख

माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज रविवार (दि. २३) मतदानाची प्रक्रिया पार शांततेत पार पडली. संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीसाठी नगरसह १४ तालुक्याच्या ठिकाणी मतदान केंद्रावर असून मतदान उत्साहात पार पडले.

माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या निवडणूकीत
‘पुरोगामी मंडळ सत्ता अबादित राहणार की स्वाभिमानी परिवर्तन सत्तेत येणार हे सोमवारी मतपेट्या उघडल्यानंतर कळेल.

या निवडणुकीसाठी सहकार विभागाचे २५० कर्मचारी नेमण्यात आले . सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडली.

त्यानंतर नंतर लगेच सोम बारी मतमोजणी होणार असल्याचे सांगण्यात आले. या निवडणुकीसाठी नगर शहरात अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल माळीवाड़ा या डिकाणी सहा मतदान केंद्र आहे. याठिकाणी नगर, पारनेर आणि श्रीगोंदा येथील मतदार मतदानाचा एक बजावणार आहेत. जामखेड तालुक्यातील
मतदान केंद्र ल. ना. होशिंग विद्यालय जामखेड या ठिकाणी महान करणार आहेत. यासह पारनेर शहरात दोन केंद्र असून हे केंद्र न्यू इमिना स्कूल व ज्युनियर कॉलेज या ठिकाणी मतदान होणार आहे. श्रीगोंदा तालुक्यातील मतदारांसाठी श्रीगोंदा माध्यमिक विद्यालय, कर्जत शहरातील समर्थ माध्यमिक विद्यालय, पाथर्डीतील संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालय, शेवगावमध्ये आबासाहेब काकडे माध्यमिक विद्यालय,

नेवारात ज्ञानेश्वर महाविद्यालय,

श्रीरामपुर एज्युकेशन सोसायटी हायस्कूल, राहुरी विद्यामंदिर प्रशाला, कोपरगावमध्ये सोमप्या कॉलेज, मोहनीराजनगर, संगमनेरमध्ये मेहेर प्राथमिक विद्यामंदिर, अकोल्यात अगस्ती माध्यमिक विद्यालय आणि राहाता पीजीएम शाळा राहाता या ठिकाणी मतदान केंद्र होते.

निवडणूक निर्णय अधिकती गणेश पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली
निवडणुकीसाठी सहकार विभागाच्यावतीने एस.पी. बनसोडे, आल्ताफ शेख, संतोष वासकर, सयाजी होळकर, महेंद्र घोडके यांनी निवडणूकीत सहाय्य केले.

सोसायटीच्या निवडणुकीसाठी यंदा दुरंगी लढत होत आहे. सत्ताधारी प्रा. भाऊसाहेब कचरे यांच्या पुरोगामी मंडळा विरोधात स्वाभिमानी परिवर्तन मंडळात सरळ लढत होत आहे. काही ठिकाणी अपक्ष निवडणुक रिंगणात होते. सत्ताधारी पुरोगामी मंडळासमोर विरोधकांनी निर्माण केलेले आव्हान प्रभावी ठरणार का? हे उद्या निवडणुकीनंतर मतमोजणीत स्पष्ट होणार आहे.

Related Articles

ताज्या बातम्या