30 C
New York
Monday, July 21, 2025

Buy now

spot_img

पोलीस ठाणे नेवासा हद्दीत *आगामी रामनवमी, ईद व आंबेडकर जयंती बंदोबस्त”*साठी पोलीसांचा रुटमार्च :

 

दै.नगरशाही नेवासा प्रतिनिधी :
*आगामी रामनवमी, ईद व आंबेडकर जयंती बंदोबस्त”* शांततेत सुव्यवस्थेत होण्यासाठी नेवासा शहर, कुकाना, नेवासा फाटा या ठिकाणी रॅपिड ऍक्शन फोर्स RAF (शीघ्र कृती दल) व जिल्हा पोलीस असा रूट मार्च 10.30 वा. ते 12.45 वा. संयुक्त रूट मार्च घेण्यात आला.

सदर रूट मार्च करीता नेवासा पोलिस ठाण्याचे निरीक्षक श्री. धनंजय जाधव यांच्यासह पोलीस ठाणे नेवासाकडील 6 अधिकारी व 26 पोलीस अंमलदार, रॅपिड ऍक्शन फोर्सचे 102 बटालियन, द्रुत कार्य बल (RAF) च्या सहायक कमांडंट श्रीमती प्रियंका सिंह परिहार त्यांच्या सोबत निरीक्षक श्री. दत्तात्रय मोहिते, जनसंपर्क अधिकारी श्री. धनंजय गुजर, तसेच 34 पोलीस कर्मचारी सहभागी झाले.

सदरचा रूट मार्च हा लक्ष वेधून घेणारा ठरला. सदर रूट मार्चचा सकारात्मक परिणाम दिसून आला.
सदरचा रूट मार्च मुख्यतः सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये सुरक्षिततेची भावना व विश्वास निर्माण व्हावा व गुन्हेगारांवर नियंत्रण राहावे हा होता.
सदरचा रूट मार्च मा. पोलीस अधीक्षक राकेश ओला, मा. अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कल्लुबर्मे व उप विभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.

Related Articles

ताज्या बातम्या