*अहिल्यानगर साईं ज्योती सरस उद्घाटन
दै.नगरशाही /परविन शेख शेवगाव प्रतिनिधी : मा.ना.डाॅ.श्री. राधाकृष्ण विखे पाटील ( मंत्री जलसंपदा तथा पालकमंत्री अहिल्यानगर) यांच्या शुभहस्ते विभागीय साई ज्योती सरस -२०२५ चे उद्घाटन संपन्न झाले .नाशिक विभाग अंतर्गत स्वयंसहायता समूहातील महिलांनी उत्पादित केलेल्या विविध वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी या उद्देशाने नाशिक विभाग, जिल्हा परिषद अहिल्यानगर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अहिल्यानगर आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय जिल्हास्तरीय व मिनी सरस विक्री प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
या प्रदर्शनात ग्रामीण भागातील महिलांनी तयार केलेल्या दर्जेदार उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी आजपासून नगरकरांनी आवर्जून भेट द्यावी असे आव्हान जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक माननीय आशिष येरेकर यांनी प्रास्ताविक करताना केले.
उद्घाटन कार्यक्रमाचे प्रसंगी जिल्ह्यातील समूहामध्ये समाविष्ट महिलांना विविध कर्ज ,वैयक्तिक कर्ज ,लखपती दीदींचा सन्मान व स्मार्ट अंतर्गत शेतकरी उत्पादक कंपन्यांना मंजुरी पत्राचे वाटप करण्यात आले.
अध्यक्षीय भाषण करताना बचत गटांनी उत्पादित केलेला वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्हास्तरावर उमेद मार्ट तयार करण्याची संकल्पना मा. मुख्यमंत्री यांनी राबवण्याचे ठरवले तसेच हा उमेद मार्ट अहिल्यानगर येथे भुतकरवाडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नावाने सुरू करण्याचे मा.मंत्री महोदय यांनी जाहीर केले तसेच अहिल्यानगर येथील सर्व तालुक्यात जिल्हा नियोजन समिती मार्फत तालुकास्तरीय उमेद माॅल सुरू करण्याचा मानस व्यक्त केला.
साई ज्योती सरस प्रदर्शन 16 मार्च ते 20 मार्च 2025 दरम्यान तांबटकर मळा गुलमोहर रोड अहिल्यानगर येथे सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे या प्रदर्शनात महिला बचत गटांनी बनवलेल्या विविध प्रकारच्या आकर्षक वस्तू लोकांना खरेदी करण्याची संधी मिळणार आहे यामध्ये खास करून महिलांनी स्वतः बनवलेले विविध खाद्यपदार्थ, हस्तकला, वस्तू ,कपडे आणि घरगुती वापराच्या विविध वस्तूंचे ३२५ स्टॉल लावले आहेत त्यात ५०० हून अधिक महिलांचा सहभाग असणार आहे या प्रदर्शनात अहिल्यानगर जिल्ह्यासह नाशिक धुळे नंदुरबार जळगाव व छ.संभाजी नगर या जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महिला बचत गटांनी तयार केलेल्या विविध आकर्षक वस्तू आणि खाद्यपदार्थ विक्रीसाठी उपलब्ध असतील महिलांच्या कर्तुत्वाला सलाम करण्यासाठी सरस माध्यमातून जिल्ह्यातील बचत गटांना त्यांची उत्पादने दाखवण्याची व उत्पादनाच्या विक्रीची संधी उपलब्ध होणार आहे या विक्रीतून बचत गटाच्या महिलांना उत्पन्न मिळणार आहे . बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी तयार केलेले उत्पादने व वस्तूंच्या माध्यमातून त्यांचे कौशल्य आणि कला सादर करतील विविध हस्तकला व सर्व उद्योग घरगुती वस्तू मसाले लोणची पापड विक्रीसाठी आहेत. अनेक पारंपारिक पदार्थांचे स्टॉल्स गुणवत्ता महिलांनी स्वतः तयार केलेल्या दर्जेदार वस्तूंना थेट बाजारपेठ सक्षमीकरण ग्रामीण महिलांच्या आर्थिक विकासाला हातभार लावण्याची संधी मिळणार आहे तसेच मनोरंजन व खरेदी सोबत सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी नगरकरांना मिळणार आहे.
या प्रसंगी आमदार श्री संग्राम भैय्या जगताप, मा. श्री विनायक देशमुख,मा.श्री संभाजी लांगोरे साहेब (अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी) मा.श्री दादाभाऊ गुंजाळ (उपमुख्य कार्यकारी अधिकारी )मा.श्री राहुल शेळके ( प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा) मा.श्री सोमनाथ जगताप (जिल्हा अभियान व्यवस्थापक ) तसेच उमेद अभियानातील सर्व कर्मचारी कर्मचारी वृद व उमेद अभियानातील रणरागिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मा.श्री राहुल शेळके (प्रकल्प संचालक ,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा) यांनी केले.